रशियाच्या विमानाला सीरियामध्ये अपघात, 32 जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2018 09:28 IST2018-03-07T09:28:09+5:302018-03-07T09:28:09+5:30
रशियाच्या एका प्रवासी विमानाला मंगळवारी (6 मार्च) सीरियामध्ये भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे.

रशियाच्या विमानाला सीरियामध्ये अपघात, 32 जणांचा मृत्यू
दमाकस - रशियाच्या एका प्रवासी विमानाला मंगळवारी (6 मार्च) सीरियामध्ये भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. सीरियातील विमानतळावर उतरत असताना या प्रवासी विमानाचा अपघात झाला. यामध्ये 32 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. संरक्षण मंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आली आहे.
स्थानिक वृत्तसंस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, हे विमान पश्चिम सीरियातील ह्मीमिम विमानतळावर उतरण्याचा प्रयत्न करत असताना ही भीषण दुर्घटना घडली. दरम्यान, यामध्ये कोणत्याही प्रकारचा हल्ला अथवा घातपात करण्यात आलेला नाही, असेही मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. या अपघातादरम्यान विमानात 26 प्रवासी आणि 6 कर्मचारी होते.
या अपघातामागे तांत्रिक कारणं असू शकतात, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, अपघातामागील कारणांचा शोध घेण्यास चौकशी सुरू करण्यात आली आहे.