पुतिन यांची 'खतरनाक हसीना' जागी झाली, जगातील गुप्तचर यंत्रणा सतर्क, काय आहे नवीन मिशन?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2025 23:31 IST2025-10-22T23:30:51+5:302025-10-22T23:31:21+5:30
अलीकडेच पुन्हा सक्रिय झालेल्या एनाला रशियाने एक नवीन मिशन दिले आहे.

पुतिन यांची 'खतरनाक हसीना' जागी झाली, जगातील गुप्तचर यंत्रणा सतर्क, काय आहे नवीन मिशन?
मॉस्को - रशिया एकीकडे युद्धामुळे कठीण परिस्थितीचा सामना करत आहेत तर दुसरीकडे देशातील सर्वात शक्तिशाली व्यक्ती मागे हटण्यास तयार नाही. अलिकडेच पुतिन यांच्या खतरनाक हसीनाबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. ही सुंदर महिला आता सक्रीय झाली आहे आणि रशियाने तिला एक नवीन मिशन सोपवले आहे. ती दुसरी तिसरी कोणी नसून रशियाची प्रसिद्ध गुप्तहेर एना चॅपमन आहे, जिच्या परत येण्यावर बरेच दावे करण्यात येत आहेत. ही तीच गुप्तहेर आहे जिला अमेरिकेने पकडले होते परंतु मजबुरीने तिला सोडण्यास भाग पाडण्यात आले.
कोण आहे एना चॅपमन?
एना चॅपमनचे खरे नाव एना रोमानोवा आहे, ती युनायटेड किंग्डमची नागरिक आहे. २०१० मध्ये अमेरिकेने तिला अटक केली तेव्हा ती प्रसिद्धीच्या झोतात आली. ती रशियन स्लीपर सेलचा एक भाग होती. नंतर अमेरिकेने तिला रशियाला परत पाठवले. एना सध्या रशियामध्ये आहे आणि काही काळापासून लोकांच्या नजरेतून गायब आहे.
रशियन गुप्तहेरांना मिळाले नवीन मिशन
अलीकडेच पुन्हा सक्रिय झालेल्या एनाला रशियाने एक नवीन मिशन दिले आहे. एनाला आता रशियन इंटेलिजेंस म्युझियमचे प्रमुख म्हणून नियुक्त करण्यात आले आहे, जे रशियाच्या प्रमुख गुप्तचर संस्थेशी, SVR (पूर्वी KGB) संलग्न आहे.
एना १० वर्षे बेपत्ता होती पण २०२० मध्ये ती ट्विटर आणि इंस्टाग्रामवर पुन्हा सक्रीय झाली. गेल्या वर्षी तिने "००७: माय लाईफ अॅज अ स्पाय" नावाचे पुस्तक प्रकाशित केले. या पुस्तकात तिच्या प्रवासाचे वर्णन केले आहे, ज्यामध्ये तिच्या हेरगिरी मोहिमा आणि अटक यांचा समावेश आहे. पुस्तकात एना रशियन गुप्तचर एजंट म्हणून तिच्या कामाचे वर्णन करते आणि पाश्चात्य देशांसोबत रशियाच्या राजनैतिक संबंधांबद्दलची गुपिते शेअर केली आहेत.