दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच आता गॅस पाइपलाइनने हल्ला; कुर्कमध्ये युक्रेनच्या सैनिकांना पाठीमागून घेरण्याचा डाव
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2025 10:43 IST2025-03-10T10:43:27+5:302025-03-10T10:43:42+5:30
रशियन सैनिक पाइपलाइनमध्ये १५ किमी चालत गेले अन् युक्रेनवर हल्ला केला

दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच आता गॅस पाइपलाइनने हल्ला; कुर्कमध्ये युक्रेनच्या सैनिकांना पाठीमागून घेरण्याचा डाव
मास्को : दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच रशियाने चक्क गॅस पाइपलाइनचा वापर करत युक्रेनवर हल्ला चढविला आहे. या पाइपमधून सुमारे १५ किमी पायी जात रशियन जवान सुझा भागात युक्रेनच्या जवानांवर तुटून पडले. दरम्यान, या पाइपमधून सुमारे १५ किमी पायी जात रशियन जवान सुझा भागात युक्रेनच्या जवानांवर तुटून पडले. दरम्यान, या भागात नव्याने पेटलेल्या संघर्षात दोन्ही बाजूंची मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
आता युक्रेन सुझा भागात असलेली आपली शस्त्रे व दारूगोळा रशियन सीमेच्या दिशेने हलवत आहे. यामुळे आगामी काळात हे युद्ध आणखी गंभीर वळणावर जाण्याची शक्यता आहे. गेल्या ऑगस्टमध्ये रशियाच्या कुस्र्क भागात हल्ला करून युक्रेनने सुमारे १३,०० वर्ग किमी क्षेत्रावर ताबा मिळवल्यापासून या भागांत दोन्ही देशांदरम्यान लढाई सुरू आहे.
सुझा हे एक मोठे गॅसच्या वाहतुकीचे केंद्र असून, यामार्फत रशिया नैसर्गिक वायू युरोपमध्ये पोहोचवतो. दरम्यान, सुझामध्ये दोन्ही देशांत तुंबळ लढाई सुरू आहे. या भागातून युक्रेनला हुसकावून लावण्यासाठी केलेल्या कारवाईत आतापर्यंत बऱ्याच मोठ्या प्रदेशावर रशियाने पुन्हा ताबा मिळवला असला तरी, या भागात युक्रेनची शक्ती अद्यापही कायमस्वरूपी आहे. हे युद्ध थांबावे यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सतत प्रयत्न सुरू केले असले तरी अद्याप त्यात म्हणावे तितके अपेक्षित असे यश मिळालेले नाही, असे दिसते.
रणनीती नेमकी काय ?
गॅस पाइपलाइनचा वापर करून युक्रेनच्या जवानांवर पाठीमागून हल्ला करण्याची रणनीती रशियाने आखली होती.
यासाठी सुमारे ५० हजार 3 जवानांची फौज मोहिमेवर पाठवण्यात आली आहे.
मोठी जीवितहानी?
रशियन सैनिकांनी गॅस पाइपलाइनचा वापर करून हल्ला करताच युक्रेनने सुझा भागात रशियन सैनिकांवर रॉकेट आणि तोफांनी जोरदार हल्ला केला आहे. यामुळे या भागात पेटलेल्या युद्धात मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाल्याची शक्यता आहे.
युक्रेनचा जोरदार प्रतिहल्ला
या हल्ल्यानंतर रशियन फौजांचे नेमके ठिकाण वेधून त्यांना रोखण्यात आले आहे. रशियन फौजा आणि त्यांची युद्धसामग्री आमच्या रॉकेट व तोफांच्या हल्ल्यात जवळपास नष्ट केली आहे.
या संघर्षानंतर पुढे काय?
रशियाच्या या नव्या हल्ल्यानंतर कुस्र्क भागात युक्रेनच्या सुमारे १० हजार सैनिकांना घेरण्यात रशियन फौजा यशस्वी झाल्या आणि कुर्क भागातून फौजा मागे घेण्याची घोषणा केली नाही तर, युक्रेनच्या सैनिकांना शरण येण्यास रशिया भाग पाडेल किंवा प्रचंड आक्रमक हल्ल्यांत युक्रेनच्या हजारो सैनिकांना प्राण गमावावे लागतील.