वयाच्या 23व्या वर्षीच बनली 11 मुलांची आई; या कोट्यधीश कपलला हवी आहेत 105 अपत्य

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2021 07:44 PM2021-07-24T19:44:35+5:302021-07-24T19:47:18+5:30

रशियात राहणारी 23 वर्षांची क्रिस्टिना आणि 56 वर्षीय गॅलीप पती-पत्नी आहेत. गॅलीप एक बिझनेसमन आहे. या रशियन जोडप्याला सध्या 11 मुलं आहेत. मात्र त्यांना आणखी मुलं हवी आहेत.

Russian Millionaire couple want 105 children, mother of 11 kids addicted to motherhood | वयाच्या 23व्या वर्षीच बनली 11 मुलांची आई; या कोट्यधीश कपलला हवी आहेत 105 अपत्य

फोटो- Kristina Ozturk इंस्टाग्राम

Next

एका कोट्यधीश जोडप्याने म्हटले आहे, की त्यांना जगातील सर्वात मोठे कुटुंब बनविण्याची इच्छा आहे. 105 मुलांचे पालक होण्याची या जोडप्याची इच्छा आहे. विशेष म्हणजे त्यांना सध्या 11 मुलं आहेत. या कोट्यधीश जोडप्याने यासाठी आपला प्लॅनदेखील सांगितला आहे. (Russian Millionaire couple want 105 children, mother of 11 kids addicted to motherhood)

रशियात राहणारी 23 वर्षांची क्रिस्टिना (Kristina) आणि 56 वर्षीय गॅलीप पती-पत्नी आहेत. गॅलीप एक बिझनेसमन आहे. या रशियन जोडप्याला सध्या 11 मुलं आहेत. मात्र त्यांना आणखी मुलं हवी आहेत.

क्रिस्टीना आणि गॅलिप यांचे म्हणणे आहे, की त्यांना 105 मुलांसह इतिहास घडवायचा आहे. हे साध्य करण्यासाठी ते सरोगसीचा अवलंब करणार आहेत. यासाठी लागणारा खर्च करण्याचीही त्यांची तयारी आहे. क्रिस्टीना म्हणते की तिला अधिक मुलाची आई व्हायचे आहे.

गॅलिप आणि क्रिस्टीना यांनी नवी मुले किती येतील, हे निश्चित केलेले नाही. मात्र, ते म्हणतात की बाळांची काळजी घेतली जाईल. त्यांची 6 वर्षांची सर्वात मोठी मुलगी विकाचा जन्म नैसर्गिकरित्या क्रिस्टीनापासूनच झाला आहे. तर इतर सर्व दहा मुले सरोगसीद्वारे जन्माला आली आहेत.

क्रिस्टीनाने न्यूजफ्लॅश मिडियाशी बोलताना सांगितले, की याक्षणी माझ्याकडे दहा मुले आहेत, गेल्या महिन्याच्या शेवटी आणखी एक मुलं आले. तिने सहा वर्षांपूर्वी मोठी मुलगी विकला जन्म दिला. बाकीची मुले सरोगसीने जन्मली आहेत. सध्या हे जोडपे जो जॉर्जियाच्या बटुमी येथे राहते. ते सध्या सरोगेसीचे आणखी पर्याय शोधत आहेत. क्रिस्टिनाची भविष्यातही अनेक मुलांची आई होण्याची इच्छा आहे.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Russian Millionaire couple want 105 children, mother of 11 kids addicted to motherhood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app