शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
5
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक इनिंग; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
6
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
11
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
12
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
13
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
14
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
15
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
16
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
17
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
18
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
19
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
20
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या

चीननंतर आता रशिया! पृथ्वीला स्पर्धा नडणार, हेरगिरीचा उपग्रह कोणत्याही क्षणी कोसळणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2021 14:22 IST

येत्या काही आठवड्यात रशियाचा गुप्तचर लष्करी उपग्रह पृथ्वीवर धडकण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

येत्या काही आठवड्यात रशियाचा गुप्तचर लष्करी उपग्रह पृथ्वीवर धडकण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. रशियाने नुकतेच या उपग्रहाचे प्रक्षेपण 'यशस्वीरित्या' केल्याचे म्हटले होते. दरम्यान आता या उपग्रहामध्ये काही तांत्रिक बिघाड झाल्याचा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. रशियाने सोमवारी आपल्या नवीन जनरेशनच्या विशाल स्पेस रॉकेट अंगारा ए-5 च्या मदतीने एक गुप्तचर उपग्रह अवकाशात पाठवला. या लष्करी उपग्रहाचे वजन सुमारे 20 टन असल्याचे सांगितले जात आहे.

हा गुप्तचर उपग्रह आणि त्याचे बूस्टर रॉकेट येत्या काही आठवड्यांत पृथ्वीवर धडकू शकतात, असे काही तज्ज्ञांचे म्हणणे आहे. रशियाचे अंगारा ए-5 रॉकेट त्याचे गुप्तचर उपग्रह, शस्त्रे आणि नेव्हिगेशनसाठी आवश्यक उपग्रहांना अवकाशात पाठवण्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे. एवढेच नाही तर या अवजड रॉकेटच्या मदतीने रशिया आपली चंद्र मोहिमही यशस्वी करण्याचे स्वप्न पाहत आहे.

तज्ञांच्या म्हणण्यानुसार या उपग्रहाचे यशस्वीरित्या प्रक्षेपण करण्यात आले. परंतु रॉकेटच्या वरच्या बाजूला असलेले बूस्टर पर्सेई उड्डाणादरम्यान निकामी झाले. या कारणास्तव, रशियन उपग्रह त्याच्या योग्य कक्षेत पोहोचू शकला नाही. तज्ज्ञांनी सांगितले की हा अनियंत्रित उपग्रह आणि त्यात बसवलेले बूस्टर सुमारे २० टन वजनाचे आहेत आणि येत्या काही आठवड्यांत ते पृथ्वीवर धडकू शकतात. तज्ज्ञांच्या या दाव्यावर रशियन लष्कराच्या हायकमांडकडून कोणतेही वक्तव्य करण्यात आलेले नाही.

इंजिनमध्ये बिघाडपर्सेईला त्याच्या चाचणी मोहिमेदरम्यान पाच इंजिन सुरू करायचे होते, परंतु दुसऱ्या इंजिनमध्ये बिघाड झाला. परिणामी, हा रशियन उपग्रह अजूनही त्याच्या अपेक्षित कक्षेत पोहोचला नाही. तसंच तो पृथ्वीवर पडण्यापूर्वी अनेक आठवडे तेथेच थांबू शकतो, अशी माहिती रशियातील माध्यमांकडून देण्यात आली. हा उपग्रह समुद्रसपाटीपासून २२,२३६ मैल उंचीवर पोहोचणार होता. गेल्या तीन वर्षांत रशियन अंतराळ संस्थेसाठी हा पहिलाच मोठा अपघात असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

टॅग्स :russiaरशियाInternationalआंतरराष्ट्रीय