सेक्स वर्कर बनलेल्या टीव्ही स्टारची नदीत आढळून आली डेड बॉडी, अंगावर होती केवळ अंडरविअर...
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2022 14:23 IST2022-08-30T14:19:25+5:302022-08-30T14:23:21+5:30
Tv star found dead : या रशियन रिअॅलिटी स्टारचं नाव अनास्तासिया कोचेरवे आहे. ती रिअॅलिटी डेटिंग शो Russion Dom 2 मध्ये दिसली होती. अनास्तासियाची डेड बॉडी सेंट पीटर्सबर्गच्या एका नदीमध्ये आढळून आली आहे.

सेक्स वर्कर बनलेल्या टीव्ही स्टारची नदीत आढळून आली डेड बॉडी, अंगावर होती केवळ अंडरविअर...
Tv star found dead : साधारण एक आठवड्यापासून गायब असलेल्या एका रिअॅलिटी टीव्ही स्टारची डेड बॉडी नदीत आढळून आली. रिपोर्ट्सनुसार, टीव्ही स्टारच्या शरीरावर केवळ अंडरविअर होती. गेल्या काही दिवसांपासून ती बेपत्ता होती. आईच्या कॅन्सरच्या उपचाराचा खर्च भरण्यासाठी ती सेक्स वर्कही करत होती.
या रशियन रिअॅलिटी स्टारचं नाव अनास्तासिया कोचेरवे आहे. ती रिअॅलिटी डेटिंग शो Russion Dom 2 मध्ये दिसली होती. अनास्तासियाची डेड बॉडी सेंट पीटर्सबर्गच्या एका नदीमध्ये आढळून आली आहे. पोलिसांनी हे स्पष्ट केलं आहे की, डेड बॉडी पॉर्न स्टार अनास्तासिया हिची आहे. आता तिच्या मृत्यूची चौकशी केली जात आहे. तिच्या मृत्यूच्या कारणांचा शोध घेतला जात आहे.
रशियन टेलीग्राम न्यूज चॅनल 112 च्या एका पोस्टनुसार, ऑगस्टच्या सुरूवातीच्या आठवड्यापासून टीव्ही स्टार गायब होती. 4 दिवस गेल्यानंतर जेव्हा टीव्ही स्टारची काही माहिती समोर आली नाही तेव्हा तिच्या आईने पोलिसात तक्रार दाखल केली.
पोलिसांनी चौकशी केली तेव्हा अनास्तासियाची डेड बॉडी एका नदीमध्ये आढळून आली. चौकशी दरम्यान अशीही माहिती मिळाली की, जेव्हापासून टीव्ही स्टार गायब झाली होती तेव्हापासून तिचा फोन ऑन होता. ती मॉस्कोच्या आसपास असल्याचं समजत होतं.
न्यूज चॅनलने दावा केला की, गेल्या काही वर्षापासून टीव्ही स्टार सेक्स वर्कर म्हणून काम करत होती. रिपोर्ट्नुसार, ती तिच्या आईच्या कॅन्सरच्या उपचारासाठी पैसे जमा करत होती. याबाबत बोलतान 2018 मध्ये अनास्तासियाने सांगितलं होतं की, हे काम करण्यात मला अजिबात गर्व नाहीये. पण कमीत कमी माझी आई तरी जीवंत राहील.
रिपोर्ट्सनुसार, टीव्ही स्टारने काही महिन्यांपूर्वी तिचं जुनं घर विकलं होतं आणि ती तिच्या रशियातील दुसऱ्या एका घरात शिफ्ट झाली होती. इन्स्टाग्रामवर अनास्तासियाचे साधारण 1 लाख 50 हजार फॉलोअर्स आहेत. पण गेल्या काही महिन्यांपासून तिने एकही पोस्ट शेअर केली नव्हती.