सीरियामध्ये आता रशियाचं तांडव; 130 एअरस्ट्राइकमध्ये ISISचे 21 दहशतवादी मारले, शेकडो जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2021 06:49 PM2021-02-20T18:49:27+5:302021-02-20T18:52:15+5:30

सीरियन सरकारचे समर्थन असलेल्या रशियन हवईदलाने गेल्या 24 तासांत संपूर्ण देशात किमान 130 ठिकाणी एअरस्ट्राइक केले. काही दिवसांपूर्वी इस्रायलनेही सीरियामध्ये क्षेपणास्त्रांचा मारा करून इराणचे समर्थन असलेल्या मिलिशियाची तळे उद्धवस्त केली होती. (Russian air force airstrike in Syria)

Russian air force airstrike in Syria kills 21 islamic state terrorist | सीरियामध्ये आता रशियाचं तांडव; 130 एअरस्ट्राइकमध्ये ISISचे 21 दहशतवादी मारले, शेकडो जखमी

सीरियामध्ये आता रशियाचं तांडव; 130 एअरस्ट्राइकमध्ये ISISचे 21 दहशतवादी मारले, शेकडो जखमी

Next

दमिश्क -सीरियामध्ये इस्ररायलनंतर आता रशियाच्या लढाऊ विमानांनी (Russian air force) जबरदस्त हाहाकार माजवला आहे. गेल्या 24 तासांत रशियाने केलेल्या एअरस्ट्राइकमध्ये आयएसआयएस (ISIS) चे किमान 21 दहशतवादी मारले गेले आहेत. तर शेकडो दहशतवादी (terrorist) गंभीर जखमी झाल्याचे समजते. (Russian air force airstrike in Syria kills 21 islamic state terrorist)

सीरियन सरकारचे समर्थ असलेल्या रशियन हवईदलाने गेल्या 24 तासांत संपूर्ण देशात किमान 130 ठिकाणी एअरस्ट्राइक केले. काही दिवसांपूर्वी इस्रायलनेही सीरियामध्ये क्षेपणास्त्रांचा मारा करून इराणचे समर्थन असलेल्या मिलिशियाची तळे उद्धवस्त केली होती.

पुतीन यांच्या सर्वात मोठ्या विरोधकाला साडेतीन वर्षांची शिक्षा; रशियात उफाळू शकतो मोठा हिंसाचार

24 तासांत 130 हवाई हल्ले -
इग्लंडमधील सीरियन ऑब्झर्व्हेटरी फॉर ह्यूमन राइट्सने म्हटले आहे, की रशियन हवाई दलाने गेल्या 24 तासांत केलेल्या 130 हवाई हल्ल्यांत 21 दहशतवादी मारले गेले आहेत. हे हल्ले, अलेप्पो, हामा आणि रक्का येथील आयएसआयएसच्या तळांवर करण्यात आले. आयएसआयएसने शनिवारी सरकारी सैन्य आणि मिलिशियावर अनेक हल्ले केले होते. यानंतर रशियन हवाई दलाने अशा पद्धतीने प्रत्युत्तर दिले आहे. आयएसआयएसने केलेल्या या हल्ल्यात सीरियाई सरकारचे समर्थन असलेल्या मिलिशियाचे 8 सैनिक मारले गेले होते.

सीरियाच्या प्रत्येक भागात युद्ध सुरू -
अजूनही सीरियाच्या बादिया भागात सरकारचे समर्थन असलेले सैन्य आणि आयएसआयएस यांच्या भीषण युद्ध सुरू आहे. यात रशियन सैन्यदेखील सीरियाला मदत करत आहे. 2014 नंतर सीरिया आणि इराक आयएसआयएसच्या दहशतीचा सामना करत आहेत. यामुळे संपूर्ण सीरियाच लढाईचे मैदान झाले आहे. सध्या सीरियाची राजधानी दमिश्क वगळता, असा कुठलाही भाग नाही, जो थेट सीरियन सरकारच्या नियंत्रणात असेल. प्रत्येक ठिकाणी, एकतर स्थानिक शस्त्रधारी गटांनी कब्जा केला आहे, अथवा आयएसआयएसच्या काही दहशतवाद्यांनी.

Budget 2021, Defence: संरक्षणावर भारतासह ‘हे’ १० देश करतात सर्वाधिक खर्च; पाहा चीन अन् रशियाचा नंबर कितवा?

सीरिया अनेक देशांसाठी बनतोय युद्धाचं मैदान -
आयएसआयएसच्या दहशतवाद्यांकडून विनाशाच्या खाईत लोटला गेलेला सीरिया आता जगभरातील शक्तिशाली देशांसाठी युद्धाचे मैदान बनत आहे. येथे अमेरिका आणि रशिया यांच्यात तणावाचे वातावरण आहे. यात रशिया सीरियन सरकारचे समर्थन करत आहे. तर अमेरिका त्यांना विरोध करत आहे. येथे अमेरिकेने सीरियातील अल्पसंख्यक गुट कुर्दोंच्या सैन्य गटांना समर्थन दिलेले आहे. 

तसेच इस्रायल देखील सीरियामधील इराणी मिलिशियाची उपस्थिती नष्ट करण्यासाठी सातत्याने हल्ले करत आहे. तर टर्कीदेखील भाडोतरी सैन्याकरवी तेथे आपले हीत साधण्याचा प्रयत्न करत आहे. यातच रशियाने आता इस्रायल आणि इराणला शांतता ठेवण्याचे आवाहन केले आहे. 

Web Title: Russian air force airstrike in Syria kills 21 islamic state terrorist

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.