रशिया उपग्रहच नष्ट करणार, अमेरिकेला चिंता

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2024 08:22 AM2024-02-17T08:22:35+5:302024-02-17T08:22:56+5:30

रशिया उपग्रहविरोधी अण्वस्त्रे विकसित करत आहे

Russia will destroy the satellite itself, America is worried | रशिया उपग्रहच नष्ट करणार, अमेरिकेला चिंता

रशिया उपग्रहच नष्ट करणार, अमेरिकेला चिंता

वाॅशिंग्टन : आकाशात भ्रमण करणाऱ्या उपग्रहांना नष्ट करू शकणारी अण्वस्त्रे रशिया तयार करत आहे. त्यामुळे कोणत्याही देशाने आकाशात सोडलेला उपग्रह भविष्यात सुरक्षित राहणार नाही, अशी चिंता अमेरिकेने व्यक्त केली आहे.

यासंदर्भात व्हाइट हाउसच्या प्रवक्त्याने म्हटले आहे की, रशिया उपग्रहविरोधी अण्वस्त्रे विकसित करत आहे. ती तैनात करण्यात आली नसल्याने आकाशातील उपग्रहांना त्वरित कोणताही धोका नाही. मात्र, भविष्यात हा धोका वाढू शकतो. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे शासकीय निवासस्थान असलेल्या व्हाइट हाउसमधील राष्ट्रीय सुरक्षा समितीच्या स्ट्रॅटेजिक कम्युनिकेश या विभागाचे समन्वयक जाॅन किर्बी यांनी हे उद्गार काढले आहेत.
 

Web Title: Russia will destroy the satellite itself, America is worried

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.