Russia vs Ukraine War: 'त्या' सीक्रेट ब्रिफकेससह दिसले पुतीन; जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर? चिंतत भर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2022 09:55 IST2022-04-09T09:53:44+5:302022-04-09T09:55:45+5:30

Russia vs Ukraine War: अंत्यसंस्काराला सीक्रेट ब्रिफरेस घेऊन पोहोचले पुतीन; जगाची धाकधूक वाढली

Russia vs Ukraine War putin takes russias nuclear football to funeral | Russia vs Ukraine War: 'त्या' सीक्रेट ब्रिफकेससह दिसले पुतीन; जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर? चिंतत भर

Russia vs Ukraine War: 'त्या' सीक्रेट ब्रिफकेससह दिसले पुतीन; जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर? चिंतत भर

मॉस्को: युक्रेनविरुद्ध रशियानं युद्ध पुकारुन दीड महिना उलटला आहे. मात्र अद्याप तरी युद्धाला पूर्णविराम होण्याची चिन्हं दिसत नाहीत. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी अनेकदा अण्वस्त्र हल्ल्याची धमकी दिली आहे. पुतीन नुकतेच सीक्रेट न्युक्लिअर ब्रिफकेससोबत दिसले. पुतीन यांचा एक फोटो समोर आला आहे. त्यात त्यांच्या मागे चालणाऱ्या व्यक्तीच्या हाती काळ्या रंगाची ब्रीफकेस आहे. 

'द सन'नं दिलेल्या वृत्तानुसार, रशियाचे अध्यक्ष पुतीन एका अंत्यसंस्कारात सहभागी होण्यासाठी मॉस्कोतील ख्राईस्ट द सेव्हियर कॅथेड्रलला पोहोचले होते. त्यावेळी त्यांची सीक्रेट ब्रिफकेस त्यांच्यासोबत होती. जुने स्नेही व्लादिमीर जिरिनोव्स्कींना श्रद्धांजली वाहण्यासाठी पुतीन पोहोचले होते. जिरिनोव्स्की आणि पुतीन यांची मैत्री फार जुनी आहे. जिरिनोव्स्की बऱ्याच कालावधीपासून कोरोनानं आजारी होते.

आपण कधीही मोठी कारवाई करू शकतो, असा संदेश पुतीन यांनी सीक्रेट ब्रिफकेस दाखवून जगाला दिल्याचं बोललं जात आहे. याआधी पुतीन यांनी अनेकदा अण्वस्त्र हल्ल्याची धमकी दिली आहे. पुतीन यांच्या नव्या फोटोमुळे तिसऱ्या महायुद्धाची शक्यता निर्माण झाली आहे. रशियन सैन्य जाणुनबुजून सर्वसामान्य युक्रेनी नागरिकांना लक्ष्य करत असल्याचा आरोप युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर जेलेन्स्की यांनी केला.

Web Title: Russia vs Ukraine War putin takes russias nuclear football to funeral