Russia-Ukraine War: खांद्यावर रायफल अन् हातात मूल..;युक्रेनच्या युद्धभूमीत उतरली 'वंडर वूमन'
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2022 12:19 IST2022-03-09T12:18:06+5:302022-03-09T12:19:12+5:30
Russia-Ukraine War: युक्रेनच्या सेंटर फॉर स्ट्रॅटेजिक कम्युनिकेशन अँड इन्फॉर्मेशन सिक्युरिटीने ट्विटरवर हा फोटो पोस्ट केला आहे. यामध्ये एक महिला आपल्या मुलाचा हात धरुन खांद्यावर रायफल घेऊन जाताना दिसत आहे.

Russia-Ukraine War: खांद्यावर रायफल अन् हातात मूल..;युक्रेनच्या युद्धभूमीत उतरली 'वंडर वूमन'
कीव:युक्रेन आणि रशिया यांच्यात सुरू असलेल्या युद्धादरम्यान कौतुकास्पद आणि धैर्याच्या अनेक घटना सोशल मीडिया मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. काल-परवा एका अकरा वर्षीय मुलाने एकट्याने एक हजार किमीचा प्रवास केल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर आता परत एकदा असाच एक फोटो व्हायरल होत आहे. फोटोमध्ये एक आई आपल्या मुलाचा हात हातात घेऊन युद्धभूमीत रस्त्यावरुन चालत आहे आणि तिच्या खांद्यावर रायफल दिसतीये.
Every Ukrainian mother deserves to be called a Wonder Woman 💪 pic.twitter.com/4m1WMArb56
— Stratcom Centre UA (@StratcomCentre) March 5, 2022
युक्रेनच्या सेंटर फॉर स्ट्रॅटेजिक कम्युनिकेशन अँड इन्फॉर्मेशन सिक्युरिटीने हा फोटो ट्विटरवर पोस्ट केला आहे. यामध्ये एक महिला आपल्या मुलाचा हात धरुन खांद्यावर रायफल घेऊन झेब्रा क्रॉसिंग पार करत आहे. फोटोसोबत कॅप्शन लिहीले की, 'प्रत्येक युक्रेनियन आई वंडर वुमन आहे.'
हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. फोटो पाहून महिलेच्या धैर्याला सलाम करत आहेत. या फोटोला 1200 हून अधिक लाईक्स मिळाले आहेत, तर विविध कमेंट्स येत आहेत. यापूर्वीही असाच एक फोटो व्हायरल झाला होता, ज्यामध्ये एक लहान मूल त्याच्या आई-वडिलांच्या युक्रेनियन सैन्याच्या गणवेशात शांतपणे झोपलेले दिसत होते.