शहरं
Join us  
Trending Stories
1
आंध्र प्रदेशातील बस अपघातातील चालकाला अटक, आग लागल्यानंतर प्रवाशांना सोडून पळून गेला होता
2
"मी दर महिन्याला एक युद्ध थांबवतो; आता पाकिस्तान-अफगाणिस्तान...," डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
3
युक्रेन युद्धादरम्यान रशियाने केली धोकादायक क्रूझ क्षेपणास्त्राची चाचणी, ‘स्टॉर्म शॅडो क्रूज’ ला रोखणे अशक्य
4
गृहकर्ज घेताय? 'या' सरकारी आणि खासगी बँका देत आहेत सर्वात स्वस्त दरात होम लोन; लगेच तपासा व्याजदर
5
"त्या वेळचे फोटो, व्हिडीओ पोलिसांनी परिवाराला दाखवले नाहीत..."; आमदार धस यांनी व्यक्त केला संशय
6
2016 चौकार...! एकदिवसीय सामन्यांत सर्वाधिक चौकार लगावणारे ७ फलंदाज, कितव्या क्रमांकावर रोहित आणि विराट?
7
महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरण; गुन्हा दाखल एकीकडे, आरोपी PSI बदने हजर दुसरीकडे!
8
आता औरंगाबाद नाही, तर छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशन; केंद्राकडून नोटिफिकेशन जारी...
9
इंग्लंड दौऱ्यानंतर गंभीर, आगरकरने काढलं संघाबाहेर, त्याच फलंदाजाने कुटल्या १७४ धावा, केली चौकार, षटकारांची बरसात
10
Video: पाईपने स्वच्छ पाणी आणले, पीएम मोदींसाठी तयार केली खोटी यमुना; 'AAP' चा मोठा दावा
11
गुंतवणूकदारांना बंपर भेट! 'ही' आयटी कंपनी देणार प्रति शेअर १३० रुपये लाभांश; रेकॉर्ड डेट कधी? लगेच तपासा
12
“ही आत्महत्या नाही, तर संस्थात्मक हत्या आहे,” सातारा प्रकरणावर राहुल गांधींचा संताप...
13
"तो आनंदी होता, आम्ही ४० मिनिटं व्हिडीओ कॉलवर बोलला..."; लेकाच्या मृत्यूने वडिलांना धक्का
14
विमानातून उतरताच ट्रम्प यांनी धरला ठेका, ठुमके पाहून मलेशियाचे पंतप्रधानही चकित झाले; बघा Video
15
सीमेवर ‘ऑपरेशन त्रिशूल’ची तयारी; पाकिस्तानी सैन्यात खळबळ, लष्करी सरावामुळे झोप उडाली
16
Gopal Badane : "मला निष्कारण अडकवलं जातंय"; निलंबित पीएसआय गोपाळ बदनेची पहिली प्रतिक्रिया
17
Video: मोठी झाल्यावर काय बनू इच्छिते? धोनीच्या 10 वर्षीय मुलीने दिले 'हे' उत्तर, तुम्हीही कराल कौतुक
18
नोकरीनंतर फिक्स उत्पन्न हवे? पोस्ट ऑफिसची 'ही' योजना देईल दरमहा ९००० रुपये; कोण करू शकतो गुंतवणूक?
19
बिहारमध्ये तेजस्वींचा मास्टरस्ट्रोक; पंचायत प्रतिनिधींना पेन्शन, ५० लाखांचा विमा, ५ लाखांची मदत अन्...! केली घोषणांची आतशबाजी
20
बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान 'दहशतवादी'...! पाकिस्तानची कारवाई, 'शाहबाज' सरकार बिथरलं; नेमकं काय घडलं?

सूर्याची उष्णता...सर्वकाही राख होणार..; रशियाची युक्रेनला "वॉरहेड" हल्ल्याची धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2025 18:08 IST

Russia Ukraine War Update: युक्रेनने रशियावर हल्ला केल्यानंतर पुतिन यांनी युक्रेनसह पाश्चात्य देशांनाही थेट इशारा दिला आहे.

Russia Ukraine War Update: युक्रेनने रशियावर आतापर्यंतचा सर्वात मोठा ड्रोन हल्ला केला आहे. युक्रेनच्या हल्ल्यात रशियाचे अनेक लढाऊ विमाने नष्ट झाली आहेत. आता या हल्ल्यानंतर रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांची पहिले प्रतिक्रिया समोर आली आहे. 'आम्ही युक्रेनला अशा वॉरहेड्सने प्रत्युत्तर देऊ, ज्याची उष्णता सूर्याच्या तापमानासारखी असेल,' असा धमकी वजा इशारा त्यांनी दिला. यावरुनच आता पुतिन आरपारच्या भूमिकेत असल्याचे दिसून येते.

पुतिन यांचा थेट इशारारशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेनला तीक्ष्ण इशारा दिला, ज्यामध्ये त्यांनी म्हटले की, असा हल्ला करू की, सर्वकाही राख होऊन जाईल. रशिया आता टार्गेट निवडत आहे, हे टार्गेट युक्रेनच्याही पलीकडे असू शकतात. झेलेन्स्की आणि त्यांच्या पाश्चात्य मालकांना पश्चात्ताप करावा लागेल. आम्ही खूप सहन केले, आता रशिया गप्प बसणार नाही. त्यांच्या विधानाला पाश्चात्य मित्र राष्ट्रांसाठी, विशेषतः अमेरिका आणि नाटोसाठी थेट धोका मानले जात आहे. पुतिन यांनी ओरेसोनिक वॉरहेड्सने हल्ला करण्याची धमकी दिली आहे.

युक्रेनच्या पलीकडे लक्ष्य म्हणजे पाश्चात्य देश!राष्ट्राध्यक्ष पुतिन म्हणाले की, प्रत्युत्तरात्मक हल्ल्यादरम्यान रशिया युक्रेनच्या पलीकडेही लक्ष्य करू शकतो. त्यांच्या विधानावरून स्पष्ट होते की, रशिया केवळ युक्रेनपुरता मर्यादित राहणार नाही. गरज पडल्यास ते पाश्चात्य देशांवर, विशेषतः अमेरिका आणि नाटोवर देखील हल्ला करू शकतात. नाटो आणि अमेरिका युक्रेनला मदत करत असून, त्यांच्या शस्त्रास्त्रांच्या मदतीनेच युक्रेन रशियन सीमेत हल्ला करण्यास सक्षम झाला आहे. 

ओरेसोनिक वॉरहेड्स म्हणजे काय?ओरेसोनिक वॉरहेड्स ही रशियाची हायपरसोनिक क्षेपणास्त्रे आहेत. यामध्ये अवांगार्ड हायपरसोनिक ग्लाइड व्हेईकल आणि किन्झल (खंजीर) हायपरसोनिक क्षेपणास्त्रे सामील आहेत. ही इतर सर्व देशांच्या क्षेपणास्त्रविरोधी संरक्षण प्रणालीला चुकवून अतिशय जलद आणि अचूक हल्ले करण्यास सक्षम आहेत. हे ध्वनीच्या वेगापेक्षा 5 पट वेगाने हल्ला करू शकतात. 

पुतिन यांच्या दाव्यानुसार, रशियाकडे असे ओरेसोनिक वॉरहेड्स आहेत, जे प्रति सेकंद 3 किलोमीटर वेगाने उडतात आणि लक्ष्यावर कोसळताना ४००० अंश सेल्सिअसपर्यंत तापमान वाढते. हे सूर्याच्या तापमानाइतकेच आहे. हे मोठा विनाश आणि विध्वंस घडवून आणू शकतात. 

तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढलापुतिन यांनी युक्रेनवर अण्वस्त्रांनी हल्ला केला, तर ते जगाला तिसऱ्या महायुद्धातही ढकलू शकते. पुतिन यांच्या विधानानंतर अमेरिका, ब्रिटन आणि नाटो खूप चिंतेत पडले आहेत. पुतिन यांचा संदेश केवळ लष्करी नसून मानसिक दबाव निर्माण करण्याची रणनीती असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. दरम्यान, संयुक्त राष्ट्रांसह अनेक युरोपीय देशांनी दोन्ही पक्षांना संयम बाळगण्याचे आणि युद्ध आणखी वाढण्यापासून रोखण्याचे आवाहन केले आहे.

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाVladimir Putinव्लादिमीर पुतिनwarयुद्धAmericaअमेरिका