शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
2
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
3
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
4
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
5
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
6
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
7
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
8
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
9
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
10
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
11
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
12
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
13
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
14
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
15
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
16
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
17
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
18
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
19
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
20
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...

रशिया-युक्रेन युद्धावर तोडगा निघण्याचे संकेत, संघर्ष मिटविण्यासाठी भारत, चीन ब्राझीलशी सातत्याने संपर्कात : व्लादिमिर पुतिन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2024 07:00 IST

Russia Ukrain War: युक्रेनशी सुरू असलेला संघर्ष मिटवण्यासाठी आपण भारत, चीन आणि ब्राझील या देशांशी सातत्याने संपर्कात असल्याचे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी म्हटले आहे. रशिया-युक्रेन युद्धावर तोडगा काढण्यासाठी हे तिन्ही देश प्रामाणिकपणे प्रयत्न करत असल्याचे त्यांनी नमूद केले.

माॅस्काे - युक्रेनशी सुरू असलेला संघर्ष मिटवण्यासाठी आपण भारत, चीन आणि ब्राझील या देशांशी सातत्याने संपर्कात असल्याचे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी म्हटले आहे. रशिया-युक्रेन युद्धावर तोडगा काढण्यासाठी हे तिन्ही देश प्रामाणिकपणे प्रयत्न करत असल्याचे त्यांनी नमूद केले. ‘तास’ या वृत्तसंस्थेने याबाबत वृत्त दिले आहे.इस्टर्न इकॉनॉमिक फोरमच्या अधिवेशनात पुतिन यांनी केलेले हे वक्तव्य म्हणजे फेब्रुवारी २०२२ पासून सुरू असलेल्या रशिया-युक्रेन युद्धावर तोडगा निघण्याचे संकेत मानले जात आहेत. या मुद्द्यावर वाटाघाटींची युक्रेनची तयारी असेल तर मी पण त्या दिशेने पाऊल टाकू शकेन, असे पुतिन यांनी म्हटल्याचे अमेरिकी वृत्तसंस्था ‘पॉलिटिको’ने म्हटले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या २३ ऑगस्ट रोजी केलेल्या युक्रेन दौऱ्यात राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांच्याशी केलेल्या चर्चेनंतर दोन आठवड्यांच्या आतच पुतिन यांनी भारताचे नाव घेऊन वाटाघाटीबाबत हे वक्तव्य केले आहे. ‘मित्र आणि सहकाऱ्यांचा आम्ही आदर करतो. या वादासंबंधी सर्व मुद्द्यांवर तोडगा निघावा म्हणून प्रामुख्याने चीन, ब्राझील आणि भारत यांच्या असलेल्या प्रामाणिक इच्छेबाबत मला विश्वास आहे’, असे पुतिन यांनी म्हटल्याचे ‘तास’ वृत्तसंस्थेने नमूद केले आहे.

रशिया म्हणताे, भारतच खुला करू शकताे चर्चेचा मार्ग- रशियन राष्ट्राध्यक्षांचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी एका वृत्तपत्राशी बोलताना युक्रेनशी चर्चेचा मार्ग खुला करण्यात भारत मदत करू शकतो, असे म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पुतिन यांच्यात असलेले विश्वासाचे आणि मैत्रीचे संबंध पाहता या वादावर तोडग्यासाठी तेच पहिले पाऊल उचलू शकतील, असेही त्यांनी नमूद केले.

-पंतप्रधान मोदी यांनी युक्रेन दौऱ्यात राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्याशी चर्चा करताना, हे युद्ध थांबवण्यासाठी दोन्ही देशांनी एकत्र चर्चा करावी आणि या भागात पूर्ण शांतता प्रस्थापित व्हावी, यासाठी भारत महत्त्वाची भूमिका पार पाडण्यास तयार असल्याचे म्हटले होते.

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाwarयुद्धVladimir Putinव्लादिमीर पुतिनIndiaभारतchinaचीनBrazilब्राझील