Russia-Ukraine War: भयावह! रशियन टँकनं युक्रेनची कार चिरडली; VIDEO पाहून तुमचाही थरकाप उडेल
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2022 14:39 IST2022-02-26T14:38:51+5:302022-02-26T14:39:57+5:30
या व्हिडिओत, एक रशियन टँक (रणगाडा) रस्त्यावरून जाणाऱ्या युक्रेनच्या एका कारला चिरडताना दिसत आहे. हा व्हिडिओ एवढा भयावह आहे, की कुणाचाही थरकाप उडेल.

Russia-Ukraine War: भयावह! रशियन टँकनं युक्रेनची कार चिरडली; VIDEO पाहून तुमचाही थरकाप उडेल
रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर तेथील लोकांचे जीव धोक्यात आले आहेत. यातच, एक थरकाप उडवणारा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत, एक रशियन टँक (रणगाडा) रस्त्यावरून जाणाऱ्या युक्रेनच्या एका कारला चिरडताना दिसत आहे. हा व्हिडिओ एवढा भयावह आहे, की कुणाचाही थरकाप उडेल. (Russian Tank Tramples Ukraine Car)
या व्हिडिओमध्ये, रस्त्यावरून जाणारा एक रशियन टँक अचानकपणे आपला मार्ग बदलून अत्यंत वाईट पद्धतीने युक्रेनमध्ये कार चिरडताना दिसत आहे. हा टँक थेट कारवर चढल्याने गाडीचा पार चुराडा झाला आहे. टँकने चिरडल्यानंतर, या कारची अवस्था पाहून कुणालाही भय वाटेल. तसेच युक्रेनमधील परिस्थितीचाही अंदाज येऊ शकेल.
माध्यमांतील वृत्तांनुसार, रशियन सैन्य युक्रेनमध्ये शिरलेले आहे आणि रशियाचे टँक युक्रेनच्या रस्त्यांवरून फिरत आहेत. लोक हा व्हिडिओ पाहून हे रशिय सैनिकांचे अमानवी कृत्य असल्याचे म्हणत आहेत. एवढेच नाही, तर याहून अधिक वेदनादायक काही असूच शकत नाही, असेही लोक म्हणत आहेत.
Shocking! A tank CHANGES direction to drive over a car! #RussiaUkraineWarpic.twitter.com/i9g0YiJRuV
— Jason Hanifin (@JasonHanifin) February 25, 2022
महत्वाचे म्हणजे, या अपघातात कारचालक सुखरूप बचावला आहे. या ड्रायव्हला वाचवल्याचा एक वहिडिओदेखील समोर आला आहे.