जगातील सर्वात श्रीमंत माणसाच्या मनाची उदारता; युक्रेननं विनंती केली, मस्क यांनी अंतराळातून मदत पाठवली!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2022 17:03 IST2022-02-27T17:01:27+5:302022-02-27T17:03:00+5:30
"एलन मस्क आपण मंगळावर घर बांधण्याचा विचार करत आहात. येथे रशिया युक्रेनवर कब्जा करत आहे..."

जगातील सर्वात श्रीमंत माणसाच्या मनाची उदारता; युक्रेननं विनंती केली, मस्क यांनी अंतराळातून मदत पाठवली!
रशियन हल्ल्यांचा सामना करत असलेल्या युक्रेनच्या मदतीसाठी आता जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती धावून आली आहे. युक्रेनच्या विनंतीवरून एलन मस्क यांनी थेट अंतराळातूनच मदत पाठवली आहे. खरेतर, रशियाच्या सायबर हल्ल्यांत युक्रेनची राजधानी कीवसह पूर्व आणि दक्षिणेकडील शहरांमध्ये इंटरनेट सेवा डाउन झाली होती. यामुळे युक्रेनने मस्क यांच्याकडे मदत मागितली होती. यानंतर, मस्क यांनी लगेचच युक्रेनमध्ये स्टारलिंक सर्व्हिस अॅक्टिव्ह केली.
युक्रेनच्या नेत्यानं ट्विट करून मागीतली होती मदत -
युक्रेनचे उपपंतप्रधान मायखाइलो फेडोरोव्ह यांनी एलन मस्क यांना टॅग करत, रशियाकडून आपल्यावर सातत्याने सायबर हल्ले होत आहेत. आम्हाला तत्काळ आपल्या मदतीची आवश्यकता आहे, असे ट्विट केले होते. या ट्विटमध्ये लिहिले होते, एलन मस्क आपण मंगळावर घर बांधण्याचा विचार करत आहात. येथे रशिया युक्रेनवर कब्जा करत आहे. आपले रॉकेट अवकाशातून यशस्वीपणे लँड करत आहेत. पण येथे रशियन रॉकेट सामान्य नागरिकांना निशाणा बनवत आहेत. आमची आपल्याकडे विनंती आहे, की आम्हाला युक्रेनमध्ये स्टारलिंक स्टेशन उपलब्ध करून देण्यात यावे, जेणेकरून आम्ही रशियाचा सामना करू शकू.
मस्क यांच्या मनाची उदारता -
युक्रेनच्या नेत्याकडून आलेल्या या ट्विटला एलन मस्क यांनीही तत्काळ उत्तर दिले. मस्क यांनी लिहिले की, स्टारलिंक सर्व्हिस आता युक्रेनमध्ये अॅक्टिव्ह आहे. काही अन्य टर्मिनल वाटेत आहेत.