शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! मोदी-राज यांच्या सभेनंतर उद्धव ठाकरे मुंबईत एकाच दिवशी घेणार ४ सभा
2
SC, ST, OBC आरक्षणाचा सर्वात मोठा समर्थक कोण? अमित शाह यांनी स्पष्टच सांगितलं, उत्तर-दक्षिण विभाजनावरही बोलले
3
Priyanka Gandhi : "राहुल गांधींनी लग्न करावं, त्यांना मुलं व्हावीत"; भावासाठी प्रियंका गांधींनी जाहीर केली इच्छा
4
अजित पवारांचे माहित नाही, पण भुजबळ नाराज असल्याचे ऐकले, त्यांना अंदाज आलाय; जयंत पाटलांचे स्पष्ट संकेत
5
उद्धव ठाकरे तुम्ही पंज्याला मत द्यायला जाताय, काहीच वाटत नाही का? गुलाबराव पाटलांचा बोचरा सवाल
6
"मी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा कार्यकर्ता, पण शेतकरी म्हणून मोदींच्या सभेला गेलो"
7
या निवडणुकीनंतर राज्यातील काही दुकाने बंद होतील, त्यात राज ठाकरेंचेही दुकान; राऊतांची टीका
8
८४ वर्षांपूर्वी दोन भावांनी McDonald'sची केलेली सुरुवात; आज ११९ देशांत ४२००० पेक्षा अधिक आऊटलेस्ट
9
सावधान! इंटरनेटलाच डॉक्टर मानता?; तर तुम्हीही ठरू शकता Idiot Syndrome चे बळी
10
Kangana Ranaut Edcuation : निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या बॉलिवूडच्या 'क्वीन'चं शिक्षण ऐकून बसेल धक्का
11
Swati Maliwal : "माझं चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न..."; स्वाती मालीवाल यांनी मारहाण प्रकरणावर मांडली व्यथा
12
निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास 'प्लॅन बी' काय?; अमित शाहांनी सांगितलं विजयाचं सीक्रेट
13
'ममता बॅनर्जींची किंमत किती, 10 लाख?'; माजी न्यायमूर्ती, नेत्याचे आक्षेपार्ह वक्तव्य, टीएमसी संतप्त 
14
ठाणे, अहमदाबाद अन् शेवटी हॉटेल बदलण्यासाठी तयारी...; भावेश भिंडे पोलिसांना कसा सापडला?
15
Narendra Modi : "मुलाला 99 गुण मिळाले तर..."; 400 पार करण्याच्या टार्गेटवर नरेंद्र मोदींनी स्पष्टच सांगितलं
16
प्रसिद्ध मराठी अभिनेता अमित खेडेकरला मातृशोक; वयाच्या 60 व्या वर्षी मालवली आईची प्राणज्योत
17
अशी महिला, जिनं उभं केलं ₹७००० कोटींचं साम्राज्य; नंतर त्याच कंपनीतून काढून टाकलं, वाचा कोण आहेत त्या?
18
पहिल्याच भेटीत तैमूरचं वागणं पाहून थक्क झाला जयदीप अहलावत; म्हणाला, 'तो मोठ्या स्टाइलमध्ये...'
19
'मुंबई पुणे मुंबई 4' कधी येणार? मुक्ता बर्वे म्हणाली, "मी, स्वप्नील आणि सतीश...'
20
२०१४ पासून पत्रकार परिषद का घेतली नाही? पंतप्रधान मोदी म्हणाले, 'मी संसदेला उत्तरदायी'

Russia Ukraine War : रशिया-युक्रेन युद्ध थांबवण्यासाठी चीनचा पुढाकार, चर्चेच्या तिसऱ्या फेरीआधी केलं मोठं विधान!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 07, 2022 2:28 PM

Russia Ukraine War: रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध थांबावं यासाठी मध्यस्थी करण्यासाठी आम्ही तयार आहोत, अशी भूमिका चीननं जाहीर केली आहे.

Russia Ukraine War: रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध थांबावं यासाठी मध्यस्थी करण्यासाठी आम्ही तयार आहोत, अशी भूमिका चीननं जाहीर केली आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांनी याबाबतची माहिती दिली आहे. युक्रेन आणि रशियातीलयुद्ध संपुष्टात यावं यासाठी आवश्यक असे सर्व प्रयत्न करण्यात येतील. तसंच दोन्ही देशांसाठी मध्यस्थाची भूमिका घेण्यासाठीही आमची तयारी आहे, असं चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी (Wang Yi) म्हणाले.

युक्रेनमध्ये झालेलं नुकसान पाहता देशाला आवश्यक अशी सर्व मदत पाठविण्यात येईल असंही चीननं जाहीर केलं आहे. त्यासोबतच रशियासोबत असलेली घट्ट मैत्री यापुढेही कायम राहणार असल्याचंही वांग यी म्हणाले. भारतीय वेळेनुसार आज दुपारी साडेपाच वाजता युक्रेन आणि रशिया यांच्यात चर्चेची तिसरी फेरी होणार आहे. याआधी रशियानं फ्रान्सच्या विनंतीनंतर नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करता यावं यासाठी युक्रेनच्या चार शहरांमध्ये तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा केली आहे. त्यानंतर आता आजच्या बैठकीत तरी तोडगा निघणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे. 

चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांनी यावेळी तैवान मुद्द्यावरही भाष्य केलं. तैवानचा मुद्दा युक्रेनच्या परिस्थितीपेक्षा पूर्णपणे वेगळा आहे कारण ते दोन देशांमधील एक देशांतर्गत प्रकरण आहे, असं वांग ली म्हणाले. तसंच ते म्हणाले की अमेरिकेतील "काही पक्ष" तैवानला धोक्याच्या दिशेने ढकलण्याचं काम करत असल्याचं म्हटलं. चीनचा उदय रोखण्यासाठी तैवानचा वापर करणे हा त्यांचा उद्देश होता, असंही ते म्हणाले.

मोदींनी केली जेलेन्स्की यांच्याशी चर्चारशिया आणि युक्रेनमधील युद्धाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर जेलेन्स्की यांच्याशी फोनवरुन चर्चा केली आहे. मोदी आणि जेलेन्स्की यांच्यात जवळपास ३५ मिनिटं फोनवर संवाद झाला. आज सकाळी ११.३० मिनिटांनी मोदींनी जेलेन्स्की यांनी फोन केला. त्यानंतर दोघांमध्ये सद्य परिस्थितीवर चर्चा झाली. 

मोदी पुतीन यांच्याशीही बोलणारयुक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधल्यानंतर पंतप्रधान मोदी आता रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनाही फोन करणार असल्याची माहिती समोर आली आहे.  युक्रेनमध्ये अजूनही अडकून असलेल्या भारतीयांच्या सुटकेच्या मुद्द्यावर मोदी पुतीन यांच्याशी चर्चा करणार असल्याचं सांगितलं जात आहे. कारण दोन्ही देशांमध्ये दिवसेंदिवस परिस्थिती अधिक चिघळत असताना भारतीय नागरिकांच्या सुरक्षेची चिंता आता व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाrussiaरशियाwarयुद्धchinaचीन