शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

Russia Ukraine War : भीषण! युक्रेनच्या मिलिट्री ट्रेनिंग ग्राऊंडवर रशियाचा 'एअर स्ट्राईक'; 35 जणांचा मृत्यू, 134 जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2022 19:38 IST

Russia Ukraine War : रशियाने युक्रेनच्या लवीव या युक्रेन-पोलंड सीमेजवळील लष्करी तळावर हवाई हल्ला केला आहे. या हल्ल्यात एकूण 35 जणांचा मृत्यू झाला असून शेकडो जण जखमी झाले आहेत.

नवी दिल्ली - रशिया आणि युक्रेनमधील वाद आता आणखी चिघळला आहे. रशियाकडून युक्रेनवर वारंवार हल्ले केले जात आहेत. याच दरम्यान युक्रेनच्या मिलिट्री ट्रेनिंग ग्राऊंडवर रशियाने 'एअर स्ट्राईक' केला आहे. यामध्ये तब्बल 35 जणांचा मृत्यू झाला असून 134 जण जखमी झाले आहेत. रिपोर्टनुसार, रशियाने युक्रेनच्या लवीव या युक्रेन-पोलंड सीमेजवळील लष्करी तळावर हवाई हल्ला केला आहे. या हल्ल्यात एकूण 35 जणांचा मृत्यू झाला असून शेकडो जण जखमी झाले आहेत. यातील अनेक जणांची प्रकृती गंभीर असल्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलंडच्या सीमेजवळ हा हल्ला झाला आहे. या हल्ल्यात ज्या ठिकाणी हल्ला झाला, तेथील प्रांतीय गव्हर्नर मॅक्सिम कोझित्स्की यांनी हल्ल्याची पुष्टी केली आहे. युक्रेनच्या संरक्षणमंत्र्यांनीही या हल्ल्याचा निषेध केला असून त्यांनी याबाबत माहिती दिली आहे. यापूर्वी, युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयाने निर्वासितांच्या ताफ्यावर रशियन गोळीबारात एका मुलासह सात युक्रेनियन ठार झाल्याची माहिती दिली होती. हल्ल्यानंतर या ताफ्याला परत जावे लागले.

रशियाने युक्रेनियन शहरांवर जोरदार बॉम्बफेक करायला सुरुवात केली आहे आणि राजधानी कीव्हच्या बाहेरील भागात गोळीबार तीव्र केला आहे. रशियन आक्रमणाचा सर्वाधिक फटका मारियुपोलला बसला आहे. सततच्या गोळीबारामुळे 430,000 लोकसंख्येच्या शहरात अन्न, पाणी आणि औषध आणण्याचे आणि अडकलेल्या नागरिकांना वाचवण्याचे प्रयत्न अयशस्वी झाले आहेत. कार्यालयाच्या म्हणण्यानुसार मारियुपोलमध्ये 1,500 हून अधिक लोक मारले गेले आहेत आणि गोळीबारामुळे सामूहिक कबरींमध्ये मृतदेह दफन करण्याच्या प्रयत्नांनाही अडथळा येत आहे. एका हिंदी  वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

 हृदयद्रावक! आजारी आईला रुग्णालयात घेऊन जाणाऱ्या महिलेवर रशियन सैनिकांनी झाडल्या गोळ्या

आईच्या औषधासाठी घराबाहेर पडलेल्या महिलेवर रशियन सैनिकांनी गोळ्या झाडल्याची भयंकर घटना घडली आहे. या हल्ल्यामध्ये महिलेसह तिच्या आईचाही दुर्दैवी मृत्यू झाला आहे. द मिररच्या रिपोर्टनुसार, वेलेरिया मक्सेत्स्का असं या महिलेचं नाव असून त्या आपल्या आईसोबत कीव्ह येथील रस्त्यावर थांबली होती. त्याचवेळी रशियन सैनिकांनी केलेल्या गोळीबारात त्यांचा मृत्यू झाला. वेलेरियाची आई खूप आजारी होती. त्यामुळे त्यांनी रुग्णालयात घेऊन जाऊन औषधं आणण्यासाठी त्या घराबाहेर पडल्या होत्या पण त्याच दरम्यान रशियन सैनिकांनी त्यांना गोळ्या घालून ठार केलं. या घटनेने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. 

 

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशिया