ऐन युद्धकाळात रशियाला मदत करण्यास चीनचा नकार; पुतिन यांना आता भारताकडून आशा, मोदी काय निर्णय घेणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2022 17:23 IST2022-03-11T17:23:28+5:302022-03-11T17:23:52+5:30
रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यापासून पाश्चात्य देश मॉस्कोवर सातत्याने निर्बंध लादत आहेत. काही दिवसांत रशियावर एवढे निर्बंध लादले गेले आहेत, की रशियाने उत्तर कोरिया आणि इराणसारख्या देशांनाही मागे टाकले आहे.

ऐन युद्धकाळात रशियाला मदत करण्यास चीनचा नकार; पुतिन यांना आता भारताकडून आशा, मोदी काय निर्णय घेणार?
युक्रेनसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यानच चीननेरशियाला मदत करण्यास नकार दिला आहे. बोईंग आणि एअरबसने विमानांच्या सुट्या भागांचा पुरवठा थांबवल्यानंतर रशियाने आपला मोर्चा चीनकडे वळवला होता. मात्र, चीनने रशियन एअरलाइन्सला विमानांच्या सुट्या भागांचा पुरवठा करण्यास नकार दिला आहे. रॉयटर्स या वृत्तसंस्थेने रशियन वृत्तसंस्थांच्या हवाल्याने यासंदर्भात वृत्त दिले आहे.
रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यापासून पाश्चात्य देश मॉस्कोवर सातत्याने निर्बंध लादत आहेत. काही दिवसांत रशियावर एवढे निर्बंध लादले गेले आहेत, की रशियाने उत्तर कोरिया आणि इराणसारख्या देशांनाही मागे टाकले आहे.
भारताकडून मदतीची आशा -
रशियन प्रवासी विमानांची उड्डाणे धोक्यात असल्याचे, रशियन परराष्ट्र मंत्रालयाने याच आठवड्यात म्हटले होते. इंटरफॅक्ससह एजन्सींनी विमानांच्या उड्डाणांत कसल्याही प्रकारचा व्यत्यय येऊ नये म्हणून, एका जबाबदार रशियन फेडरल एअर ट्रान्सपोर्ट एजन्सी अधिकारी वालेरी कुडिनोव यांचा हवाला देत, चीन ने नकार दिल्यानंतर रशिया आता भारत आणि तुर्की सारख्या देशांकडून मदतीसाठी डोळे लावून पाहत आहे.
गेल्या 10 मार्चला प्रसिद्ध झालेल्या एका मसुदा कायद्याने, रशियन सरकारला, देशांतर्गत विमान कंपन्यांना भाडेतत्त्वावर घेतलेल्या विमानांसाठी रूबलच्या माध्यमाने पैसे देण्यासंदर्भातही योजना आखली आहे.