Russia-Ukraine War: रशिया-युक्रेन युद्धात SBI चे कोट्यवधी रुपये अडकले, कशी होणार रिकव्हरी? वाचा...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2022 17:13 IST2022-03-03T17:11:32+5:302022-03-03T17:13:50+5:30
युक्रेनवरील हल्ल्यानंतर रशियाला जागतिक पेमेंट सिस्टममधून (SWIFT) सर्वांनी एकटं पाडलं आहे. यामुळे रशियात कार्यरत असणाऱ्या इतर देशांच्या काही कंपन्या आणि फायनान्शियल इन्स्टिट्युशनसमोर मोठ्या अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे.

Russia-Ukraine War: रशिया-युक्रेन युद्धात SBI चे कोट्यवधी रुपये अडकले, कशी होणार रिकव्हरी? वाचा...
युक्रेनवरील हल्ल्यानंतर रशियाला जागतिक पेमेंट सिस्टममधून (SWIFT) सर्वांनी एकटं पाडलं आहे. यामुळे रशियात कार्यरत असणाऱ्या इतर देशांच्या काही कंपन्या आणि फायनान्शियल इन्स्टिट्युशनसमोर मोठ्या अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. भारतीय बँकांच्याबाबतीत विचार करायचा झाल्यास यात सरकारी क्षेत्रातील भारतीय स्टेट बँकेला (SBI) काही प्रमाणात झटका बसण्याची शक्यता आहे. एका अहवालानुसार रशियात एसबीआयचा व्यवहार १० मिलियन डॉलर म्हणजेच ७५ कोटी रुपयांपेक्षाही कमी आहे आणि सिनिअर बँकर्सच्या अंदाजानुसार यातील जास्तीत जास्त रक्कम रिकव्हर होण्याचीही शक्यता आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, एसबीआयची ही रिकव्हरी ट्रान्झाक्शनशी निगडीत आहे. रशियन कंपन्यांसोबतच्या व्यवहारावर बंदी घालण्यात आल्यानंतर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं (RBI) या अडचणीवर उपाय शोधण्याची तयारी सुरू कण्यात आली आहे. अडकलेले पैसे कसे रिकव्हर करता येतील यावर विचार सुरू आहे. यासाठी आरबीआयकडून सर्व बँकांकडून माहिती जमा केली जात आहे. रशियात नेमके किती पैसे अडकून पडले आहेत आणि त्याची सद्यपरिस्थीती काय आहे याची माहिती आरबीआयकडून एकत्र केली जात आहे. सर्व बँकांकडून माहिती मिळाल्यानंतर यावरील अॅक्शन प्लानची घोषणा करण्यात येण्याची शक्यता आहे.