शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

चीनशी तणाव, या 'जिगरी' मित्रानं दिली साथ; UNSCच्या स्थायी सदस्यत्वासाठी केलं भारताचं समर्थन

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2020 7:41 PM

भारत संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या स्थायी सदस्यत्वासाठी एक उमदा उमेदवार आहे. यामुळे आम्ही भारताच्या उमेदवारीचं समर्थन करतो, असं या मित्रानं म्हटलं आहे.

ठळक मुद्देरशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लावरोव यांनी सुरक्षा परिषदेतील स्थायी सदस्यत्वासाठी भारताचे समर्थन केले.भारत आणि चीनला बाहेरून काही मदतीची आश्यकता आहे, असे मला वाटत नाही - लावरोव गेल्या आठवड्यातच भारताची संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत आठव्यांदा अस्थायी सदस्य म्हणून निवड झाली आहे.

मॉस्को :भारत-चीन सीमेवर तणावाचे वातावरण असतानाच रशियाने पुन्हा एकदा संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या (UNSC) स्थायी सदस्यत्वासाठी भारताला पाठिंबा दिला आहे. सुरक्षा परिषदेत स्थायी सदस्यत्वासाठी भारताच्या उमेदवारीचे रशियाने समर्थन केले आहे. 

रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लावरोव यांनी सुरक्षा परिषदेतील स्थायी सदस्यत्वासाठी भारताचे समर्थन केले. यापूर्वीही सुरक्षा परिषदेतील भारताच्या स्थायी सदस्यत्वासाठी रशियाने भारताचे समर्थन दिले होते. विशेष म्हणजे, भारत आणि चीन यांच्यात सीमेवर तणावाचे वातावरण असातानाच, सर्गेई यांचे हे वक्तव्य आले आहे. 

चीनच्या दादागिरीला भारताचं चोख उत्तर, टक्कर देण्यासाठी तयार केलं जबरदस्त 'चक्रव्यूह'

भारत एक प्रबळ उमेदवार - लावरोवरशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लावरोव म्हणाले, आज आम्ही संयुक्त राष्ट्राच्या संभाव्य सुधारणांवर चर्चा केली. तसेच, भारत संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या स्थायी सदस्यत्वासाठी एक उमदा उमेदवार आहे. यामुळे आम्ही भारताच्या उमेदवारीचे समर्थन करतो. आमचा विश्वास आहे, की भारत सुरक्षा परिषदेचा पूर्ण सदस्य बनू शकतो.

सानिया मिर्झाच्या पतीवर कोरोनाचं संकट! आज येईल रिपोर्ट; ...तरच मिटेल 'लंबी जुदाई'

जेव्हा देशाचा मुद्दा येतो, तेव्हा भारत आणि चीनला बाहेरून काही मदतीची आश्यकता आहे, असे मला वाटत नाही. कारण, ते स्वतःच्या बळावर समस्या सोडवण्यास समर्थ आहेत. असे लावरोव म्हणाले. ते आरआयसीच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या बैठकीत बोलत होते. 

मोदी सरकारच्या 'या' निर्णयामुळे चीनला झोंबली मिर्ची; ...तर अमेरिका अन् रशियाही कामी येणार नाही, भारताला दिली धमकी

भारत आणि चीन दोघांनीही शांततेसाठी पुढाकार घेतला आहे. तसेच त्यांनी संरक्षण अधिकारी आणि परराष्ट्र मंत्री स्तरावरही बैठका सुरू केल्या आहेत. दोन्ही पक्षांपैकी कुणीही, असे वक्तव्य केलेले नाही, ज्यामुळे परिस्थिती बिघडेल. या बैठकीत भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकरदेखील सहभागी झाले होते. काही दिवसांपूर्वीच ऑस्ट्रेलियानेही भारताच्या संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेतील स्थायी सदस्यत्वाला पाठिंबा दिला आहे.

फायर पावरच्या बाबतीत इंडियन एअरफोर्स ड्रॅगनला भारी; चीनच्या कोणत्याही कोपऱ्यात करू शकते हल्ला!

सध्या भारत अस्थायी सदस्य - गेल्या आठवड्यातच भारताची संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत आठव्यांदा अस्थायी सदस्य म्हणून निवड झाली आहे. मागच्या आठवड्यात झालेल्या निवडणुकीत भारताला 192 मतांपैकी 184 मते मिळाली होती.

भारतासाठी धोका बनलाय चीन, हा 'खास' मित्र लवकरच देणार 33 फायटर जेट

टॅग्स :united nationsसंयुक्त राष्ट्र संघrussiaरशियाIndiaभारतchinaचीनborder disputeसीमा वाद