Coronavirus : महासंकटाचा सामना करण्यासाठी रशिया भारताला देणार Sputnic-V चे आणखी दीड लाख डोस

By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2021 02:47 PM2021-05-06T14:47:59+5:302021-05-06T14:50:48+5:30

जुलै महिन्यापर्यंत रशिया भारताला स्पुटनिक व्ही लसीचे एक कोटी डोस पाठवणार. भारतासाठी अनेक देशांनी पुढे केला मदतीचा हात.

Russia sending another batch of 150,000 Sputnik V vaccines to India coronavirus pandamic second wave | Coronavirus : महासंकटाचा सामना करण्यासाठी रशिया भारताला देणार Sputnic-V चे आणखी दीड लाख डोस

Coronavirus : महासंकटाचा सामना करण्यासाठी रशिया भारताला देणार Sputnic-V चे आणखी दीड लाख डोस

googlenewsNext
ठळक मुद्देजुलै महिन्यापर्यंत रशिया भारताला स्पुटनिक व्ही लसीचे एक कोटी डोस पाठवणार.भारतासाठी अनेक देशांनी पुढे केला मदतीचा हात.

सध्या भारतात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांची नोंद होत आहे. अशा परिस्थितीत देशातील आरोग्य व्यवस्थेवर मोठा ताण पडताना दिसत आहे. दरम्यान, अनेक देशांनी भारताकडे मदतीचा हात पुढे केला आहे. दरम्यान, यापूर्वी भारताचा जुना मित्र समजल्या जाणाऱ्या रशियानंही भारताला मोठ्या प्रमाणात मदत केली होती. तसंच Sputnik-V या लसीचे काही डोस पाठवले होते. आता पुन्हा एकदा रशिया पुढील दोन दिवसांमध्ये Sputnik-V या लसीच्या दीड लाख डोसची दुसरी खेप पाठवणार आहे. याव्यतिरिक्त मे महिन्याच्या अखेरिस हैदराबाद येथील डॉ. रेड्डी लॅबमध्ये तीस लाख डोस येणार आहे. सध्या जून महिन्यापर्यंत ५० लाथ आणि जुलै महिन्यापर्यंत Sputnik-V चे एक कोटी डोस भारतात पाठवण्याची तयारी रशियाकडून सुरू आहे.

नवी दिल्ली आणि मॉस्को येथील काही अधिकाऱ्यांनुसार रशिया कमीतकमी चार ऑक्सिजन उत्पादन करणारे ट्रक दिल्लीला पाठवत आहे. वीजेचा पुरवठा झाल्यानंतर २०० बेड्सच्या रुग्णालयाला ऑक्सिजन पुरवठा करू शकतो. "आम्ही यापूर्वीच चार ट्रकची खरेदी केली आहे आणि अधिक मिळवण्याचे प्रयत्न करत आहोत, जेणेकरून ऑक्सिजनची कमतरता भासणार नाही. हे ट्रक रशियाच्या IL-76 या विमानानं या आठवड्यात भारतात पोहोचतील," असंही त्यांनी सांगितलं.

Coronavirus Vaccine : कोविशिल्ड, कोव्हॅक्सिन की स्पुटनिक व्ही कोणती लस अधिक प्रभावी?; जाणून घ्या माहिती

१ मे पासून देशात लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याला सुरूवात झाली. या दिवशीच Sputnik-V या लसीच्या दीड लाख डोसची पहिली खेप भारतात आली होती. ही लस ९० टक्क्यांपेक्षा अधिक प्रभावी असल्याचं सांगण्यात आलं आहे. १२ एप्रिल रोजी भारतात आपात्कालिन वापरासाठी या लसीला मंजुरी देण्यात आली होती. रशियानं दिल्लीच्या कलावती रुग्णालयाला ७५ व्हेंटिलेटर्स, २० मोठ्या क्षमतेचे ऑक्सिजन कन्सन्ट्रेटर्स आणि मध्ये दिल्लीच्या रुग्णालासाठी १५० बेड्सचा मॉनिटर पाठवला होता. यापूर्वी खासगी निधीतून ६० मोठ्या ऑक्सिजन कन्सन्ट्रेटर्सशिवाय रशियानं उत्तर भारतातील एम्समध्ये कोरोना विषाणूच्या सुरूवातीच्या टप्प्यात उपचारासाठी वापरण्यात येणाऱ्या २ लाख गोळ्याही पुरवल्या होत्या. तसंच सध्या रशिया रेमडेसिवीरचा पुरवठा करण्यासही उत्सुक असल्याचं म्हटलं जात आहे.

Web Title: Russia sending another batch of 150,000 Sputnik V vaccines to India coronavirus pandamic second wave

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.