Russia Plane Crash:रशियाचे एक लष्करी ट्रान्सपोर्ट विमानअपघातग्रस्त झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सोव्हिएत काळातील An-22 (एन-22) हे मिलिट्री ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट 9 डिसेंबर रोजी रशियाच्या इवानोवो प्रदेशात चाचणी उड्डाणादरम्यान कोसळले. या अपघातातविमानातील सर्व 7 जणांचा मृत्यू झाला आहे. घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.
उच्चस्तरीय चौकशीचे आदेश
स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, या अपघाताची चौकशी करण्याचे आदेश रशियाच्या उच्चस्तरीय समितीने दिले आहेत. सरकारी वृत्तसंस्था RIA नोवोस्तीनुसार, विमान मध्य रशियातील इवानकोवो वस्तीच्या जवळ कोसळले. हे गाव एका जलाशयाच्या उत्तरेकडील काठावर वसलेले आहे.
हवेतच विमानाचे दोन तुकडे
व्हायरल व्हिडिओमध्ये जलाशयात कोसळण्यापू्र्वी विमानाचे दोन तुकडे झाल्याचे दिसते. क्रेमलिनशी संबंधित एका टेलिग्राम चॅनलने दावा केला आहे की, या विमानाची अलीकडेच दुरुस्ती करण्यात आली होती. RIA नोवोस्तीच्या माहितीनुसार, तपास पथकाला विमानाचा ढिगारा जलाशयात सुमारे 5 मीटर खोल आणि किनाऱ्यापासून अंदाजे 150 मीटर अंतरावर आढळून आला.
याआधीही झाला होता लष्करी विमान अपघात
याआधी मार्च 2024 मध्ये रशियाचे Il-76 लष्करी ट्रान्सपोर्ट विमान कोसळले होते. त्या अपघातात 15 जणांचा मृत्यू झाला होता. या भीषण अपघातामुळे रशियाच्या जुन्या लष्करी विमानांच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
Web Summary : A Russian military transport plane, An-22, crashed during a test flight in the Ivanovo region, killing all seven crew members. The aircraft reportedly broke apart mid-air before crashing into a lake. An investigation is underway to determine the cause.
Web Summary : रूस का एक सैन्य परिवहन विमान, An-22, इवानोवो क्षेत्र में परीक्षण उड़ान के दौरान दुर्घटनाग्रस्त हो गया, जिसमें सभी सात चालक दल के सदस्यों की मौत हो गई। विमान कथित तौर पर हवा में टूट गया और फिर एक झील में गिर गया। जांच जारी है।