Russia Plane Crash: रडारवरून गायब, घनदाट जंगलात कोसळले; रशियन विमान अपघाताचे कारण काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2025 14:35 IST2025-07-24T14:34:33+5:302025-07-24T14:35:38+5:30
Russia Plane Crash: रशियाच्या अमूर प्रदेशात सुमारे ५० जणांना घेऊन जाणारे अँटोनोव्ह एएन-२४ प्रवासी विमान कोसळले. या अपघातात कोणीही वाचण्याची शक्यता नाही. विमानाचे अवशेष जंगलात जळताना आढळले आहेत.

Russia Plane Crash: रडारवरून गायब, घनदाट जंगलात कोसळले; रशियन विमान अपघाताचे कारण काय?
Russia Plane Crash: रशियामध्ये प्रवासी विमानाचा भीषण अपघात झाला. या विमानाचा उड्डाणानंतर काही वेळातच नियंत्रण कक्षासोबत संपर्क तुटला. अँटोनोव्ह एएन-२४ प्रवासी विमान होते. विमानात सुमारे ५० लोक होते. या अपघातामध्ये सर्व प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
Russia Plane Crash: रशियात बेपत्ता विमान कोसळले, अपघातानंतर स्फोट; पाच चिमुकल्यांसह ४३ जण ठार
विमानाचे अवशेष जंगलात जळताना आढळले. हेलिकॉप्टरमधून घेतलेल्या फोटोंमध्ये विमानाचा पुढचा भाग आगीच्या ज्वाळांनी वेढलेला दिसतो. बचाव पथके घटनास्थळी पोहोचत आहेत, पण परिस्थिती अत्यंत कठीण आहे.
हे विमान सायबेरियन एअरलाइन्स अंगारा यांचे होते. हे विमान ब्लागोवेश्चेन्स्कहून टिंडा येथे जात होते. हे विमान १९७६ मध्ये तयार केले होते. विमान सोव्हिएत काळातील होते. टिंडा येथे पोहोचताच हे विमान अचानक रडारवरून गायब झाले.
अपघाताचे कारण काय?
खराब हवामान आणि क्रूची चूक या अपघाताचे कारण असल्याचे मानले जात आहे. "खराब दृश्यमानतेमध्ये लँडिंग करताना क्रूने चूक केली, यामुळे हा अपघात झाल्याचे, रशियन वृत्तसंस्था TASS ने म्हटले आहे.
विमानाचे अवशेष टिंडा पासून १५ किलोमीटर अंतरावर एका टेकडीवर आढळले. "रोसावियात्सिया येथील एका एमआय-८ हेलिकॉप्टरने एक विमान जळत असल्याचे पाहिले.
चीनच्या सीमेजवळ अपघात
हा अपघात चीनच्या सीमेला लागून असलेल्या ठिकाणी झाला आहे. बचाव पथके अजूनही अपघातस्थळी पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत, पण घनदाट जंगले आणि आगीमुळे बचाव प्रयत्नांमध्ये अडथळा येत आहे. रशियन अधिकाऱ्यांनी अपघाताची चौकशी सुरू केली आहे. विमान अमूर प्रदेशातील टिंडा या लहान शहराकडे जात होते. हा परिसर चीनच्या सीमेला लागून आहे.