शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

रशियाने भारताला दिली एक खतरनाक ऑफर, पाकिस्तानचं टेन्शन वाढलं, आली डोळे पांढरे होण्याची वेळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2025 11:42 IST

India Russia Ties, Pakistan: दिल्ली स्फोटाचा तपास सुरू असतानाच आली मोठी माहिती

India Russia Ties, Pakistan: दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ १० नोव्हेंबरला स्फोट झाला. या प्रकरणात आतापर्यंत अनेक खुलासे झाले आहेत. तपास यंत्रणा दररोज छापे टाकत आहेत. सुरक्षा आणि तपास यंत्रणांनी या हल्ल्यात अनेकांना अटक केली असून साऱ्यांची चौकशी समोर सुरू आहे. दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणाची तपास यंत्रणांकडून कसून तपासणी आणि चौकशी सुरू असतानाच, भारतासाठी एक चांगली बातमी आली आहे. रशियानेभारताला एक दमदार ऑफर दिली आहे, ज्यामुळे पाकिस्तानची चिंता भलतीच वाढली आहे.

रशियाने त्यांच्या सर्वात प्रगत पाचव्या एडिशनमधील Su-57E फायटर जेट्सचे अपग्रेडेड व्हर्जन सादर केले आहे. हे व्हर्जन निर्यातसाठी तयार करण्यात आले आहे. भारताला संरक्षणाच्या क्षेत्रात तंत्रज्ञानाची साथ मिळणार असल्याने ही ऑफर अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. रशियन अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की ही ऑफर भारत-रशियाच्या सहा दशकांपासूनच्या संरक्षण सहकार्याला पुन्हा बळकटी देण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरेल. डिसेंबरमध्ये राष्ट्राध्यक्ष पुतिन भारत दौऱ्यावर येणार असतानाच या ऑफरची चर्चा रंगली आहे.

दुबई एअर शोमध्ये रशियाने Su-57E चे अपग्रेड केलेले मॉडेल रिलीज केले. तसेच भारताला एक व्यापक पॅकेज देखील ऑफर केले. त्यात Su-57E लढाऊ विमानांचा पुरवठा, परवानाकृत उत्पादन, हवेतून सोडल्या जाणाऱ्या शस्त्रांचा एक नवीन गट, भारतीय युद्धसामग्रीचे एकत्रीकरण, दीर्घकालीन देखभाल आणि समर्थन आणि अप्रतिबंधित तंत्रज्ञान हस्तांतरण यांचा समावेश आहे.

Su-57E मध्ये काय खास आहे?

रशियाच्या दाव्यानुसार, हे लढाऊ विमानाच्या सर्व गोष्टींची पूर्तता करते. शत्रूला न दिसता हल्ले करण्याची क्षमता त्यात आहे. या जेटमध्ये लांब अंतरापर्यंत सुपरसॉनिक वेग राखण्याची क्षमता आहे. कॉकपिट स्वयंचलित आहे. त्यामुळे एआयच्या मदतीने वैमानिक जलद निर्णय घेऊ शकतात. त्याचे ऑनबोर्ड AESA रडार २४० किलोमीटरपर्यंतचे लक्ष्य शोधू शकते. हे जेट धोकादायक तर आहेच, पण त्यासोबत शस्त्रांसह एक मिनी-पायलट म्हणून देखील काम करते.

पाकिस्तानची चिंता का वाढली?

रशियाकडून मिळालेल्या या ऑफरमुळे भारताला एक स्टेल्थ लढाऊ विमान मिळणार आहे. हे एक उच्च-तंत्रज्ञान आणि भविष्यकालीन संरक्षण क्षमता ओळखून बनवलेले जेट आहे. शत्रूच्या नजरेस न पडता हल्ला करण्यास हे सक्षम आहेत. यामुळे भारताची लष्करी शक्ती एका नवीन पातळीवर नेण्यात मदत होणार आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Russia offers advanced fighter jets to India; Pakistan worried.

Web Summary : Russia offered India advanced Su-57E fighter jets, boosting defense capabilities. The deal includes technology transfer and weaponry, strengthening India-Russia ties. Pakistan fears India's enhanced military power.
टॅग्स :russiaरशियाPakistanपाकिस्तानIndiaभारत