शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
3
"सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
4
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
5
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
6
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
7
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
8
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
9
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
10
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
11
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."
12
Mumbai: भर पावसात रेनकोटसह कुणी रडत तर कुणी हसत पोहोचले शाळेत!
13
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
14
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
15
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
16
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
17
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
18
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
19
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
20
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव

Russia News: स्वीडन आणि फिनलंड 'नाटो'चे सदस्य होणार? रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी दिली धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2022 17:50 IST

Russia News: सुमारे दीड दिवस चाललेल्या प्रदीर्घ चर्चेनंतर 200 पैकी 188 फिन्निश खासदारांनी NATO सदस्यत्वाच्या बाजूने मतदान केले. तर, तुर्कीने फिनलंड आणि स्वीडन दहशतवादी गटांचे गड म्हणून काम करत असल्याचा आरोप करत, आम्ही या विस्ताराला मान्यता देणार नाही, असे म्हटले आहे.

Russia News: स्वीडन आणि फिनलंडने नाटोमध्ये सामील होण्यासाठी सदस्यत्व अर्ज सादर केले आहेत. तुर्कस्तानने लष्करी युती थांबवण्याची धमकी देऊनही हा निर्णय घेण्यात आला आहे. स्वीडनच्या पंतप्रधान मॅग्डालेना अँडरसन यांनी फिनिश राष्ट्राध्यक्ष साऊली निनिस्टो यांच्यासमवेत संयुक्त पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. फिनलंड रशियाबरोबर 1300 किमी सीमा सामायिक करतो. रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यामुळे स्वीडनही त्रस्त आहे. रशियन आक्रमणाविरूद्ध संरक्षण म्हणून फिनलंड नाटोमध्ये सामील झाल्यामुळे अनेक दशकांची लष्करी अलायनमेंट संपुष्टात येईल. 

दरम्यान, राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी धमकी दिली आहे की, नाटोचा विस्तार रशियाला प्रत्युत्तर देण्यास भाग पाडू शकतो. पण फिनलंड आणि स्वीडनच्या सदस्यत्वात जो अडथळा निर्माण होऊ शकतो तो अलायन्समधूनच येऊ शकतो. तर, नाटोचे सरचिटणीस जेन्स स्टोल्टनबर्ग यांनी वारंवार आग्रह धरला आहे की, ते दोन्ही देशांचे खुल्या हाताने स्वागत करतात. दुसरीकडे, तुर्कीने फिनलंड आणि स्वीडन दहशतवादी गटांचे गड म्हणून काम करत असल्याचा आरोप करत, आम्ही या विस्ताराला मान्यता देणार नाही, असे म्हटले आहे.

सर्व सदस्यांची संमती आवश्यक आहेवॉशिंग्टनमधील परराष्ट्र प्रवक्ते नेड प्राइस यांनी विश्वास व्यक्त केला की, अंकारा दोन्ही देशांच्या युतीमध्ये प्रवेश करण्यास अडथळा आणणार नाही. दुसरीकडे या ऐतिहासिक बोलीसाठी अँडरसन आणि निनिस्टो अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन यांची भेट घेणार आहेत. EU परराष्ट्र व्यवहार प्रमुख जोसेप बोरेल यांनी सांगितले की, ब्रुसेल्समध्ये EU संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीनंतर या बोलीला पूर्ण पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे नाटो सदस्यांची संख्या वाढेल आणि त्यामुळे युरोपचे सामर्थ्य आणि सहकार्य वाढेल, असे ते म्हणाले. कोणतीही सदस्यत्वाची बोली तेव्हाच स्वीकारली जाते, जेव्हा NATO चे सर्व 30 सदस्य त्यास सहमती देतात.

सदस्यत्वावर दीर्घ वादसुमारे दीड दिवस चाललेल्या प्रदीर्घ चर्चेनंतर, 200 पैकी 188 फिन्निश खासदारांनी NATO सदस्यत्वाच्या बाजूने मतदान केले. फिनलंडच्या 75 वर्षांच्या लष्करी अलायनमेंट धोरणाच्या अगदी विरुद्ध जाऊन हा मतदान झाले. चर्चेला सुरुवात करताना, फिनिश राष्ट्राध्यक्ष सना मारिन यांनी संसदेत सांगितले की, रशिया हा एकमेव देश आहे जो युरोपच्या सुरक्षेला धोका आहे. सध्याच्या परिस्थितीत आपल्या देशाची सुरक्षा महत्वाची आहे. 

सार्वजनिक मत काय आहेस्वीडन-फिनलंड हे जवळपास शतकभर रशियन साम्राज्याचा भाग होते. 1917 मध्ये त्यांना स्वातंत्र्य मिळाले. त्यानंतर 1939 मध्ये सोव्हिएत युनियनने त्यावर हल्ला केला. लोकांच्या मतानुसार, सुमारे तीन चतुर्थांश फिन्निश लोकांना अलायन्ससोबत जायचे आहे. स्वीडनचा निर्णय खूपच धक्कादायक आहे, कारण ते दुसऱ्या महायुद्धात पूर्णपणे तटस्थ राहिले  होते. तसेच, गेल्या 200 वर्षांपासून लष्करी अलायन्सच्या बाहेर आहेत. 

टॅग्स :russiaरशियाRussia Ukrainयुक्रेन आणि रशियाVladimir Putinव्लादिमीर पुतिन