शांतता चर्चेच्या आधीच रशियाने युक्रेनवर केला भीषण ड्रोन हल्ला; हल्ल्यात एका वृद्ध महिलेचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2026 07:09 IST2026-02-15T07:08:35+5:302026-02-15T07:09:56+5:30

दुसरीकडे, युक्रेनने रशियाच्या सीमेवरील बेलगोरोड शहरावर क्षेपणास्त्र डागले असून, त्यात २ रशियन नागरिक मृत्यू झाल्याचा दावा केला.

Russia launches deadly drone attack on Ukraine ahead of peace talks | शांतता चर्चेच्या आधीच रशियाने युक्रेनवर केला भीषण ड्रोन हल्ला; हल्ल्यात एका वृद्ध महिलेचा मृत्यू

शांतता चर्चेच्या आधीच रशियाने युक्रेनवर केला भीषण ड्रोन हल्ला; हल्ल्यात एका वृद्ध महिलेचा मृत्यू

कीव्ह/जिनेव्हा : रशिया आणि युक्रेनमधील युद्ध थांबवण्यासाठी अमेरिकेच्या पुढाकाराने जिनेव्हामध्ये पुढील सप्ताहात शांतता चर्चा होणार आहे. मात्र, या महत्त्वाच्या चर्चेच्या अवघ्या काही दिवस आधी रशियाने युक्रेनच्या ओडेसा शहरावर शुक्रवारी भीषण ड्रोन हल्ला केला आहे. या हल्ल्यात एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला असून, निवासी इमारतींचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे पुन्हा एकदा तणाव वाढला असून, चर्चेच्या यशावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. युक्रेनच्या आपत्कालीन सेवा विभागाने ही माहिती दिली.

दुसरीकडे, युक्रेनने रशियाच्या सीमेवरील बेलगोरोड शहरावर क्षेपणास्त्र डागले असून, त्यात २ रशियन नागरिक मृत्यू झाल्याचा दावा केला.

जिनेव्हात होणार ‘महाचर्चा’

रशियाच्या हल्ल्याला ४ वर्षे पूर्ण होत असतानाच, पुढच्या आठवड्यात जिनेव्हात दोन्ही देशांच्या प्रतिनिधींमध्ये चर्चा होईल. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी उभय देशांना करारासाठी जूनची डेडलाइन दिली. क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह व युक्रेनचे सल्लागार दिमित्रो लिट्विन यांनी याला दुजोरा दिला.

Web Title : शांति वार्ता से पहले रूस का यूक्रेन पर हमला; वृद्ध महिला की मौत

Web Summary : जिनेवा में शांति वार्ता से पहले, रूस ने यूक्रेन के ओडेसा पर ड्रोन हमला किया, जिसमें एक वृद्ध महिला की मौत हो गई और इमारतें क्षतिग्रस्त हो गईं। यूक्रेन ने जवाबी कार्रवाई में रूस में दो लोगों की मौत का दावा किया। चार साल के युद्ध के बीच तनाव बढ़ रहा है।

Web Title : Russia Attacks Ukraine Before Peace Talks; Elderly Woman Killed

Web Summary : Ahead of Geneva peace talks, Russia launched a drone attack on Odesa, Ukraine, killing an elderly woman and damaging buildings. Ukraine retaliated, allegedly killing two in Russia. Geneva talks aim to find resolution amidst escalating tensions as war nears four years.