शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिकेच्या दबावाला न जुमानता भारत-रशियात होणार S-400 एअर डिफेन्स डील

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2018 11:04 IST

रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन लवकरच भारताच्या दौ-यावर येणार आहेत.

मॉस्को- रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन लवकरच भारताच्या दौ-यावर येणार आहेत. या दौ-यात भारत आणि रशियादरम्यान S-400 क्षेपणास्त्र खरेदी करार करण्यात येणार आहे. पुतिन यांच्या भारत दौ-याआधीच त्यांच्या एका अधिका-यानं हे सांगितलं आहे. पुतिन सरकारमधले परराष्ट्र मंत्रालयाचे सल्लागार युरी उशाकोव म्हणाले, राष्ट्रपती 4 ऑक्टोबरला भारतासाठी रवाना होत आहेत.या दौ-याचा मुख्य उद्देश एस-400 क्षेपणास्त्र प्रणालीच्या करारावर स्वाक्षरी करण्याचा आहे. एस-400 क्षेपणास्त्र प्रणालीसाठीचा हा करार 5 अब्ज डॉलरचा होणार आहे. परंतु अमेरिकेचा या कराराला तीव्र विरोध आहे. रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या माहितीनुसार, या दौ-यात पुतिन पंतप्रधान नरेंद्र मोदींशी अधिकृतरीत्या चर्चा करणार आहेत. ते राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेणार आहेत. भारताची दरवर्षी होत असलेल्या द्विपक्षीय चर्चांमध्ये रशियाचाही समावेश आहे. तसेच भारताबरोबर दरवर्षी द्विपक्षीय चर्चा करणारा जपान हा दुसरा देश आहे. भारत-रशियादरम्यानच्या द्विपक्षीय संबंध हे विशेष महत्त्वाचे आहेत.मागील काही दिवसांपूर्वी भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराजही रशियाच्या दौ-यावर गेल्या होत्या. तेव्हा पुतिन यांचं त्यांच्याशी बोलणं झालं होतं. त्या बैठकीदरम्यान 2025पर्यंत 50 अब्ज डॉलरची गुंतवणूक करणा-यावर दोन्ही देशांमध्ये सहमती झाली आहे. 5 ऑक्टोबरला मोदी आणि पुतिन यांच्या द्विपक्षीय चर्चेत एस-400 क्षेपणास्त्र प्रणालीसाठीच्या करारावर स्वाक्षरी होण्याची चिन्हे आहेत. रशियाकडून S-400 क्षेपणास्त्र प्रणाली घेण्यासाठी भारतावर निर्बंध घालण्याचे संकेत अमेरिकेने दिले आहेत.काय आहे एस-400 क्षेपणास्त्र प्रणाली ?एस-400 ही जगातील अत्याधुनिक क्षेपणास्त्र प्रणाली असून, या प्रणालीमध्ये शत्रूची विमानांना अचूकरीत्या लक्ष्य करण्याचं सामर्थ्य आहे. गेल्या अनेक वर्षांपासून भारत आणि रशियामध्ये शस्त्रास्त्र करत होत असून, भारत रशियाकडून अत्याधुनिक शस्त्रास्त्र खरेदी करत असतो. काही दिवसांपूर्वी झालेल्या अमेरिकेबरोबर टू प्लस टू बैठकीत एस-400च्या खरेदी व्यवहाराला परवानगी मिळावी, यासाठी भारत प्रयत्नशील होता. परंतु अमेरिकेनं त्याला अजून अधिकृतरीत्या परवानगी दिलेली नाही. 

टॅग्स :russiaरशियाIndiaभारत