भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2025 17:16 IST2025-08-05T17:15:08+5:302025-08-05T17:16:49+5:30

भारत आणि रशियामधील तेल खरेदीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कर लावण्याचा इशारा दिला आहे. या धमकीनंतर दोन्ही देशांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

Russia gets angry after receiving threat to India tells America Don't threaten | भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'

भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'

भारत आणि रशियाच्या तेल खरेदीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठ्या प्रमाणात कर लादण्याचा इशारा दिला आहे. या इशाऱ्यानंतर भारत आणि रशिया या दोन्ही देशांनी अमेरिकेला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. 

मंगळवारी अमेरिकेच्या धमकीवर रशियाने जोरदार प्रतिक्रिया दिली. "इतर देशांना रशियासोबत व्यवसाय करण्यापासून रोखणे बेकायदेशीर आहे", असं क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह म्हणाले.

आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर

"प्रत्येक देशाला आपल्या व्यापाराचा निर्णय घेण्याचा अधिकार आहे. कोणावरही असा दबाव आणणे ही 'धमकी' मानली जाईल. रशियाचे हे विधान ट्रम्प यांनी दिलेल्या इशाऱ्याच्या दुसऱ्याच दिवशी आले आहे. अमेरिकेने याआधी भारताला रशियाकडून तेल घेतले तर कर वाढवले जातील असा इशारा दिला होता. यानंतर भारतानेही अमेरिकेला प्रत्युत्तर दिले होते. 

डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले होते?

सोमवारी रात्री डोनाल्ड ट्रम्प यांनी करबाबत भारताला इशारा दिला होता. ट्रम्प म्हणाले होते की, भारत केवळ रशियन तेल खरेदी करत नाही तर ते खुल्या बाजारात विकून नफाही कमावत आहे. "युक्रेनमध्ये रशियन सैन्य किती लोकांना मारत आहे याची भारताला पर्वा नाही. म्हणूनच मी भारतावर मोठे शुल्क लादणार आहे".

भारतानेही केला पलटवार

डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर भारत सरकारने प्रत्युत्तर दिले. परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, "भारताला अशा प्रकारे लक्ष्य करणे चुकीचे आहे. आपण एक मोठी अर्थव्यवस्था आहोत आणि आपल्या राष्ट्रीय हितांचे रक्षण करण्यासाठी आवश्यक पावले उचलू." भारताने स्पष्ट केले की, आम्ही स्वतःचं निर्णय घेऊ आणि कोणाच्याही दबावाखाली येणार नाही.

Web Title: Russia gets angry after receiving threat to India tells America Don't threaten

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.