शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सचे QUALIFIER 1चे स्वप्न भंगणार? पंजाब किंग्सकडून हरल्याने समीकरण बदलले
2
८०० दिवसांहून अधिक काळ सुरू असलेले युद्ध संपणार? व्लादिमीर पुतिन यांचं युक्रेनबाबत मोठं वक्तव्य
3
घाटकोपर होर्डिंग्ज एजन्सीची मान्यता तत्काळ रद्द करून काळ्या यादीत टाका; अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
4
"दिल टूट गया है..", कॉमेडियन श्याम रंगीलाचा उमेदवारी अर्ज फेटाळला, वाराणसीतून लढवता येणार नाही निवडणूक!
5
सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट; नांदुरघाटमध्ये दोन गटांत तुफान दगडफेक
6
इंडिया आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर बाहेरुन पाठिंबा देणार; ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
7
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवलं; आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना टोला 
8
'मुस्लिमांशी घट्ट नाते आहे' म्हणणारे पंतप्रधान मोदी मुस्लीम द्वेषावरच भाषण देतात, नाना पटोलेंची टीका
9
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर RRच्या फलंदाजांची धडपड; रियान पराग एकटा लढला
10
एकहाती सत्तेपेक्षा 'मिलीजुली' सरकार देशहिताचं, जे सगळ्यांची 'मन की बात' ऐकेल; आदित्य ठाकरेंनी मांडला वेगळाच मुद्दा
11
"अरविंद केजरीवाल यांच्यासाठी माझ्याकडे एक वाईट बातमी आहे..."; काय म्हणाले अमित शाह?
12
Anil Desai, Congress: ठाकरे गटाच्या उमेदवाराशी आधी काँग्रेस कार्यकर्ते भिडले, मग खांद्यावरून घेऊन नाचले; गैरसमजातून वाद, नेमकं काय घडलं?
13
झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती कोट्यावधींची रोकड!
14
धक्कादायक! वाहन चालवत असतानाच फार्मासिस्टचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
15
राहुल गांधींच्या पत्रिकेत पंतप्रधान बनण्याचा योग नाही; भाजप नेत्याचा खोचक टोला...
16
Neeraj Chopra : नीरज चोप्राने आणखी एक सुवर्णपदक जिंकले, महाराष्ट्राच्या पाटीलची 'उत्तम' कामगिरी
17
पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती ट्रक चालकांना जाळ्यात फसवायची अन् तो उकळायचा पैसे
18
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
19
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
20
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं

इराकमध्ये संयुक्त फौजेच्या तळावर पुन्हा रॉकेट हल्ले

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2020 4:34 AM

या हल्ल्यांची जबाबदारी आजवर कोणीही स्वीकारलेली नाही. मात्र हाशेद अल्-शाबी या दहशतवादी संघटनेने हे हल्ले केल्याचा आरोप अमेरिकेने केला आहे.

बगदाद : इराकमध्ये बगदाद शहराच्या उत्तर भागामध्ये अमेरिकेच्या नेतृत्वाखालील संयुक्त फौजेच्या असलेल्या लष्करी तळावर दहशतवाद्यांनी शनिवारी पुन्हा रॉकेट हल्ले केले. इराकमध्ये अमेरिकी सैनिक व राजदूत राहत असलेल्या ठिकाणांवर गेल्या ऑक्टोबर महिन्यापासून झालेला हा २३वा हल्ला आहे. त्यामध्ये किती जीवितहानी झाली त्याचा तपशील अद्याप समजू शकलेला नाही.या हल्ल्यांची जबाबदारी आजवर कोणीही स्वीकारलेली नाही. मात्र हाशेद अल्-शाबी या दहशतवादी संघटनेने हे हल्ले केल्याचा आरोप अमेरिकेने केला आहे. बगदादमधील संयुक्त फौजेच्या तळावर जिथून शनिवारी रॉकेट हल्ले करण्यात आले ते ठिकाण इराकी लष्कराने शोधून काढले आहे.ढगाळ हवामानामुळे संयुक्त फौजेची टेहळणी यंत्रणा कमकुवत झाल्याचा फायदा घेऊन दहशतवाद्यांनी शनिवारी दिवसाढवळ््या लष्करी तळावर रॉकेट हल्ले केले. ताजी या भागामध्ये हा लष्करी तळ आहे. याआधी तीन दिवसांपूर्वी याच तळावर झालेल्या रॉकेट हल्ल्यात अमेरिका, ब्रिटनचा प्रत्येकी एक सैनिक व एक अमेरिकी कंत्राटदार असे तीन जण ठार झाले होते. त्यानंतर हाशेद अल् शाबी या संघटनेतील इराणचा पाठिंबा असलेल्या काताईब हिजबुल्ला या गटाच्या तळांवर संयुक्त फौजांनी शुक्रवारी प्रत्युत्तरादाखल जोरदार हल्ले चढविले होते. (वृत्तसंस्था)इराक सरकारवर अमेरिका नाराजइराण व अमेरिकेच्या संघर्षामुळे आपला नाहक बळी जाईल अशी भीती इराकच्या विद्यमान सत्ताधाऱ्यांनाही वाटत असते. अमेरिकेने गेल्या वर्षी केलेल्या ड्रोन हल्ल्यामध्ये इराणचा कमांडर कासीम सोलेमानी व हाशेद अल्-शाबीचा उपप्रमुख अबू महदी अल्-मुहांदीज हे दोघे ठार झाले होते. त्यानंतर इराणने इराकमधील अमेरिकी सैनिकांवर क्षेपणास्त्र हल्ले चढविले होते. सध्या इराकमध्ये ५२०० अमेरिकी सैनिक आहेत. अमेरिकी सैनिक व राजदूत राहत असलेल्या ठिकाणांवर दहशतवाद्यांकडून होणारे हल्ले रोखण्यासाठी इराक सरकार प्रभावी उपाययोजना करीत नसल्याबद्दल अमेरिकेने तीव्र नाराजी व्यक्त केली होती.

टॅग्स :United Statesअमेरिका