शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंना भाजपाचा मोठा धक्का; २ मोठ्या नेत्यांचा लवकरच पक्षप्रवेश होणार
2
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
3
हत्येनंतर शीर अन् धड वेगळे केले, सुटकेसमध्ये मृतदेह लपवून फरार; अखेर १६ वर्षांनी आरोपीला अटक
4
महाराष्ट्राच्या १५ हजार एकर महसूल जमिनीसह सीमेवरील १४ गावांवर तेलंगण राज्याचा ताबा !
5
भारताकडे 'रेअर अर्थ'चा ५वा सर्वात मोठा खजिना; तरीही आयातीसाठी चीनवर का अवलंबून? 'ही' आहे खरी अडचण
6
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
7
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
8
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
9
"मला पुढच्या जन्मी गोविंदा पती म्हणून नकोय...", सुनीता अहुजाचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली- "हा एकच जन्म..."
10
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
11
ट्रॉलरसह आठ मच्छीमारांचे पाकिस्तानकडून अपहरण?
12
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
13
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
14
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
15
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
16
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
17
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
18
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
19
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
20
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!

बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2025 09:50 IST

महत्वाचे म्हणजे, हा सराव माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या विसर्जित अवामी लीगने १३ नोव्हेंबर रोजी पुकारलेल्या “ढाका लॉकडाऊन” कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आला आहे.

बांगलादेशची राजधानी असलेल्या ढाकाला सध्या छावणीचे स्वरुप आले आहे. शेख हसीना यांच्या प्रभावामुळे बांगलादेशातील युनूस सरकार असे काही गडबडले आहे की, संपूर्ण ढाक्यातील सुरक्षा व्यवस्था मोठ्या प्रमाणावर वाढवण्यात आली आहे. खरे तर, राजधानी ढाका येथे शनिवार (8 नोव्हेंबर) पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर सुरक्षा सराव केला. महत्वाचे म्हणजे, हा सराव माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या विसर्जित अवामी लीगने १३ नोव्हेंबर रोजी पुकारलेल्या “ढाका लॉकडाऊन” कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आला आहे.

ढाका मेट्रोपॉलिटन पोलिसांनी दिलेल्या (DMP) माहितीनुसार, सुमारे ७००० पोलीस कर्मचाऱ्यांनी शहरातील १४२ महत्त्वाच्या ठिकाणी हा सराव केला. यात अंतरिम सरकारचे प्रमुख मुहम्मद युनुस यांच्या निवासस्थानाचाही समावेश होता. आगामी आठवड्यातील संभाव्य हिंसक निदर्शनांना तोंड देण्याच्या उद्देशाने हा सराव करण्यात आला.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, ढाक्यात पोलिसांची उपस्थिती मोठ्या प्रमाणावर वाढली आहे, यामुळे नागरिकांमध्ये कायदा-सुव्यवस्थेबाबत चिंता निर्माण झाली आहे. बांग्लादेशातील आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरण लवकरच शेख हसीना यांच्यावरील मानवतेविरुद्ध गुन्ह्यांच्या खटल्याचा निकाल जाहीर करणार आहे. तसेच, पोलिसांनी ही तैनाती म्हणजे, नियमित सुरक्षा कवायतीचा भाग असल्याचे म्हटले आहे.

ढाक्यातील प्रमुख चौकांत पोलीस दंगलविरोधी उपकरणांसह तैनात आहेत. पादचार्‍यांच्या बॅग तपासल्या जात आहेत. संशयास्पद वाहनांची तपासणी करत होते. पोलीस प्रवक्ता मुहम्मद तालेबुर रहमान यांनी सांगितले की, “आपत्कालीन परिस्थितीसाठी तत्पर राहणे ही आमची नियमित कार्यपद्धती आहे.” एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, हा मेगा सराव पोलिसांच्या समन्वयाची चाचणी आणि १३ नोव्हेंबरपूर्वी संभाव्य हिंसाचार रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय होता.

दरम्यान, तीन दिवसांपूर्वी लष्कराने १५ महिन्यांपासून पोलिसिंग ड्युटीवर असलेल्या ६०,००० सैनिकांपैकी अर्धे सैनिक परत बोलावले आहेत. तसेच, सैनिकांना विश्रांती आणि प्रशिक्षणाची गरज गरज असल्याचेही लष्कराने म्हटले आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Bangladesh: Dhaka Under Security Lockdown, Focus on Muhammad Yunus' Residence

Web Summary : Dhaka resembles a garrison due to heightened security measures. Police conducted drills near Muhammad Yunus's residence amid political tensions and upcoming protests. Anticipating violence before a planned lockdown, authorities are increasing security presence, raising concerns among residents.
टॅग्स :BangladeshबांगलादेशPoliceपोलिस