शहरं
Join us  
Trending Stories
1
गोंदियात EVM चं सील तोडल्याचा आरोप तर सांगलीत रातोरात मतदान वाढल्याचा दावा; स्टाँगरूमबाहेर राडा
2
मुंबईत दुबार मतदारांचा गोंधळात गोंधळ सुरुच; पहिल्याच प्रयोगात नावाशी साधर्म्य असणारेच सर्वाधिक मतदार
3
पतीची हत्या करून ड्रममध्ये टाकणाऱ्या मुस्कानची नवी मागणी; तुरुंगात प्रियकरासाठी केली ही मागणी
4
कर्जासाठी कायपण! पाकिस्तानला विकावी लागणार सरकारी विमान कंपनी; 'फिल्ड मार्शल' मुनीर यांचा डोळा
5
मुलींसाठी LIC ची जबरदस्त स्कीम, ₹१२१ रुपयांच्या बचतीतून मिळेल लाखोंचा रिटर्न; कोणती आहे योजना?
6
"डोळे मिट, मनात इच्छा धर, फुंकर मार"... रोहित शर्मा- ऋषभ पंत यांचा भर मैदानात वेगळाच 'खेळ'; व्हिडिओ व्हायरल
7
भाजपाचं धक्कातंत्र सुरूच...! श्रीकांत शिंदेंच्या मतदारसंघातील शिंदेसेनेचे बडे नेते लावले गळाला
8
Post Office मध्ये ६० महिन्यांसाठी २ लाख रुपये जमा केले तर मॅच्युरिटीवर किती रक्कम मिळेल? पटापट चेक करा डिटेल्स
9
आजचे राशीभविष्य, ४ डिसेंबर २०२५: अचानक धनप्राप्ती अन् विविध फायदे होतील, ज्याने आनंदित व्हाल
10
Orange Gate Tunnel: सोळा मजली उंच इमारतीइतक्या खोल, ७०० इमारतींखालून जाणार ऑरेंज गेट बोगदा
11
Bike Taxi: बेकायदेशीर बाईक टॅक्सी चालवणाऱ्या ' रॅपिडो, उबेर 'ला बसणार दणका; कंपन्यांवर गुन्हे दाखल होणार
12
संयुक्त राष्ट्रात १० दिवसांत भारताविरोधात ३ प्रस्ताव; रशियानं 'व्हेटो' वापरत निभावली मैत्री
13
प्रशिक्षणादरम्यान F-16C लढाऊ विमान वाळवंटात कोसळलं; कॅलिफोर्नियातील थरारक घटना!
14
रुपया नव्वदीपार, गाठला ऐतिहासिक तळ; महागाई वाढणार, विद्यार्थ्यांपासून गृहिणींपर्यंत सर्वांना बसणार फटका
15
हळद पिवळी पोर कवळी...! तेजस्वीनी लोणारीची लगीनघाई, हळदी समारंभाचे फोटो समोर
16
शेतकरी मदतीचा मुद्दा गाजला; कृषिमंत्री आधी म्हणाले, ‘नाही’ नंतर म्हणाले, ‘हो, प्रस्ताव आला’
17
चापलूस एआय तुमची हुजरेगिरी करायला सोकावले आहे!
18
लंकादहन: भाजप-शिंदेसेनेतील वाद गाजला, सत्तापक्षांतील वादांचे निवडणुकीत झाले प्रदर्शन
19
विशेष लेख: व्हेंटिलेटरवर ठेवलेली ‘राज्यघटना’ समजून घेताना...
20
Indigo Flights Issue: ...म्हणून इंडिगोची सेवा ढेपाळली; १०० पेक्षा जास्त विमाने झाली रद्द
Daily Top 2Weekly Top 5

"माझे नाव इतिहासात नक्कीच लक्षात ठेवले जाईल"; निरोपाच्या भाषणात ऋषी सुनक यांचे विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2024 20:55 IST

ब्रिटनमध्ये राहणाऱ्या १.८ दशलक्ष भारतीयांना ही बाब प्रभावित करेल, असेही सुनक म्हणाले.

Rishi Sunak, Last Speech as PM: प्रसिद्ध उद्योगपती नारायण मूर्ति यांचे जावई असलेले ऋषी सुनक यांना निवडणुकीतील पराभवानंतर ब्रिटनच्या पंतप्रधानवरून पायउतार व्हावे लागले. ब्रिटनच्या लेबर पार्टीचे नेते केयर स्टारर हे नवे पंतप्रधान बनले. शुक्रवारी त्यांनी बकिंगहॅम पॅलेसमध्ये राजा चार्ल्स तिसरे यांची भेट घेतली आणि अधिकृतपणे पदभार स्वीकारला. कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे नेते ऋषी सुनक यांनी '10 डाऊनिंग स्ट्रीट'च्या पायऱ्यांवर निरोपाचे भाषण दिले. या भाषणावेळी, "मी या पदावर असताना देशवासीयांच्या सेवेसाठी सर्वतोपरि प्रयत्न केले आणि माझे नाव नक्कीच इतिहासात लक्षात ठेवले जाईल", असे म्हणत त्यांनी पंतप्रधानपदाचा निरोप घेतला.

ऋषी सुनक हे ब्रिटनचे पहिले भारतीय वंशाचे नेते, पहिले हिंदू नेते आणि पहिले गैर-गौरवर्णीय समुदायाचे नेते होते. ते म्हणाले, "नव्या ब्रिटनच्या जडणघडणीमध्ये सर्वोत्तम गोष्टींपैकी एक म्हणजे देशाच्या सर्वोच्च पदापर्यंत माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीने पोहोचणे हे प्रत्येकासाठी प्रेरणा देईल. विशेषत: येथे राहणाऱ्या १.८ दशलक्ष भारतीयांना नक्कीच ही बाब प्रभावित करेल."

"कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे सर्व उमेदवार आणि प्रचारक, ज्यांनी अथक परिश्रम केले परंतु त्यांना यश आले नाही, त्यांनी खचून जाऊ नका. मला खेद वाटतो की मी तुमच्या अपेक्षांना पात्र ठरू शकलो नाही. पण तुम्हा सर्वांच्या मेहनतीबद्दल, तुमच्या सेवेबद्दल मी तुमचे आभार मानतो. तसेच मी ब्रिटनच्या नागरिकांची माफी मागतो. मी या देशासाठी सर्वस्व पणाला लावून काम केले. पण तुम्ही स्पष्ट संकेत दिलेत की ब्रिटनचे सरकार बदलले पाहिजे. तुमचा हा निर्णय महत्त्वाचा आहे आणि मला मान्य आहे. तुमचा रोष, तुमची निराशा याची मी जबाबदारी घेतो." असेही सुनक यांनी प्रामुख्याने नमूद केले.

"तुमचा पंतप्रधान म्हणून मी पहिल्यांदा इथे उभा राहिलो, तेव्हा मी तुम्हाला सांगितले होते की माझ्याकडे असलेले सर्वात महत्त्वाचे काम म्हणजे आपल्या अर्थव्यवस्थेला स्थिरता आणणे. महागाईवर नियंत्रण आणणे. या कार्यकाळात आपल्या देशाचे जगात स्थान वाढले ​​आहे. मित्रराष्ट्रांशी संबंध पुन्हा निर्माण केले आहेत. त्यामुळेच ब्रिटन परिवर्तनशील तंत्रज्ञानाच्या नवीन पिढीचे माहेरघर बनत आहे आणि मला त्या यशाचा अभिमान आहे," अशा शब्दांत सुनक यांनी आपल्या कार्याचा थोडक्यात माहिती दिली आणि दिलेल्या देशवासीयांचे आभार मानले.

टॅग्स :Rishi Sunakऋषी सुनकEnglandइंग्लंडIndiaभारत