अमिरातीतील श्रीमंत भारतीयांमध्ये डॉ. दातार यांना १८ वे मानांकन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2018 05:24 IST2018-12-06T05:24:39+5:302018-12-06T05:24:47+5:30

अल अदील ट्रेडिंगचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. धनंजय दातार यांना अरेबियन बिझनेसतर्फे संयुक्त अरब अमिरातीतील (यूएई) सर्वांत श्रीमंत भारतीयांच्या यादीत वर्ष २०१८ साठी १८ वे मानांकन देऊन नुकतेच गौरवण्यात आले.

In the rich Indians of empire, Dr. 18th standard for Datar | अमिरातीतील श्रीमंत भारतीयांमध्ये डॉ. दातार यांना १८ वे मानांकन

अमिरातीतील श्रीमंत भारतीयांमध्ये डॉ. दातार यांना १८ वे मानांकन

दुबई : अल अदील ट्रेडिंगचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. धनंजय दातार यांना अरेबियन बिझनेसतर्फे संयुक्त अरब अमिरातीतील (यूएई) सर्वांत श्रीमंत भारतीयांच्या यादीत वर्ष २०१८ साठी १८ वे मानांकन देऊन नुकतेच गौरवण्यात आले. या यादीत समावेश असलेले डॉ. दातार हे एकमेव महाराष्ट्रीय उद्योजक आहेत. गेल्या दोन वर्षांत त्यांनी ३९ व्या क्रमांकापासून १८ व्या क्रमांकापर्यंत येण्याची कामगिरी केली आहे.
यासंदर्भात डॉ. दातार म्हणाले, पुरस्कार व गौरव मी करीत असलेल्या कार्याची जबाबदारी वाढवणारे आहे. सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून आमच्या ग्राहकांना वर्धित मूल्य मिळवून देण्यासाठी आम्ही निरंतर प्रयत्नरत राहू. आमच्या प्रयत्नांना पाठिंबा, प्रोत्साहन देणाऱ्या संयुक्त अरब अमिरातीच्या शासकांचा मी आभारी आहे.

Web Title: In the rich Indians of empire, Dr. 18th standard for Datar