'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2025 09:11 IST2025-09-21T09:10:04+5:302025-09-21T09:11:41+5:30

Donald Trump Afghanistan: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अफगाणिस्तानला जाहीरपणे धमकी दिली आहे. अफगाणिस्तानातील बगराम हवाई तळ परत अमेरिकेला सोपवा, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. 

'Return Bagram Air Base to america, Otherwise The Consequences Will Be Very Bad'; Donald Trump Threatens Afghanistan | 'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी

'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी

Donald Trump Bagram Air Base: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अफगाणिस्तानातील बगराम हवाई तळाचा मुद्दा उपस्थित केला आहे. अफगाणिस्तानने बगराम हवाई तळ अमेरिकेला परत द्यावे अन्यथा परिणाम खूप वाईट होतील, अशी धमकीच ट्रम्प यांनी दिली आहे. तालिबानने बंड करून सत्ता ताब्यात घेतली तेव्हा अमेरिकेने हे तळ सोडले होते. पण, आता ट्रम्प यांनी पुन्हा या हवाई तळावर दावा केला आहे. 

अफगाणिस्तानातील परवान प्रांतात असलेल्या बगराम एअर बेस ज्याला बगराम एअरफील्ड म्हणून ओळखले जाते. आंतरराष्ट्रीय भू-राजकीय दृष्टीने हे अफगाणिस्तानातील महत्त्वाचे तळ आहे. त्यामुळेच ट्रम्प पुन्हा एकदा हे हवाई तळ ताब्यात घेण्याचे प्रयत्न करू लागले आहेत. 

हवाई तळ परत केले नाही, तर वाईट गोष्टी घडतील 

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल ट्रूथ सोशल मीडियावर एक पोस्ट करून अफगाणिस्तानला धमकी दिली आहे. ट्रम्प म्हणाले, 'जर अफगाणिस्तानने बगराम हवाई तळ ज्यांनी ते उभारले आहे, अर्थात अमेरिकेला परत केले नाही, तर वाईट गोष्टी घडतील."

ट्रम्प असेही म्हणाले की, सध्या आम्ही अफगाणिस्तानसोबत चर्चा करत आहोत. आमची इच्छा आहे की, बगराम हवाई तळ लवकर आमच्या ताब्यात यावे. जर अफगाणिस्तानने असे केले नाही, तर तुम्हाला माहिती आहे की, मी काय करणार आहे.

यापूर्वी ट्रम्प यांनी अफगाणिस्तानातील एका हवाई तळाबद्दल विधान केले होते. ते म्हणाले होते की, काबुलजवळील एक अफगाणिस्तानचे हवाई तळ अमेरिका ताब्यात घेण्याची योजना तयार कर आहे. जेणेकरून चीनवर नजर ठेवली जाईल. 

बगराम हवाई तळ आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या दृष्टीने महत्त्वाचे का?

सध्या बगराम हवाई तळ तालिबानच्या नेतृत्वाखाली असलेल्या अफगाणिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाच्या ताब्यात आहे. हे तळ चीन, इराण आणि पाकिस्तानच्या जवळ आहे. त्यामुळे या प्रदेशांवर नजर ठेवणे, तसेच लष्करी नियंत्रण ठेवणे सोपे जाते. याच कारणामुळे अमेरिकेला ते आपल्या ताब्यात ठेवायचे आहे. 

२००१ मध्ये  अमेरिकेत झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर अमेरिकेने लष्करी मोहीम हाती घेतली आणि केलेल्या कारवाई बगराम हवाई तळ ताब्यात घेतले होते. त्यानंतर लष्करी कारवायांचे ते केंद्र बनले होते. हे तळ अमेरिकेने विकसित केले, त्याचबरोबर त्याचा विस्तारही केला. 

२०२० मध्ये तालिबानने बंड केले. त्याच काळात अमेरिकेने हे तळ सोडले. त्यानंतर अफगाणिस्तानी लष्कराला हे तळ सांभाळता आले नाही आणि तालिबानने सहज त्यावर नियंत्रण मिळवले होते. 

Web Title: 'Return Bagram Air Base to america, Otherwise The Consequences Will Be Very Bad'; Donald Trump Threatens Afghanistan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.