शहरं
Join us  
Trending Stories
1
अयोध्येमध्ये सिलेंडरचा भीषण स्फोट, घर कोसळून ५ जणा्ंचा  मृत्यू, अनेक जण अडकल्याची भीती  
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या गळ्यात शांततेचं नोबेल, नेतन्याहू यांनी शेअर केला असा फोटो, म्हणाले…
3
"सामाजिक विषमता निर्माण करण्याला शरद पवार जबाबदार', मनोज जरांगेंच्या भेटीनंतर राधाकृष्ण विखेंचा आरोप 
4
'हो, ते प्रवासी विमान आम्ही पाडलं होतं', अनेक महिन्यांनंतर व्लादिमीर पुतीन यांची कबुली
5
मनात नसताना रोहित-विराट 'तो' निर्णय घेणार? मोठी माहिती आली समोर
6
CJI गवईंवर बूट फेकणाऱ्या वकिलाला शरद पवारांचे खासदार निलेश लंकेंनी दिल्लीत गाठले; त्यानंतर...
7
महिलेने रडत रडत केला फोन, पोलिसांना सांगितलं पतीचं गुपित, घराची झडती घेताच बसला धक्का 
8
क्रिकेटच्या मैदानात AI ची ‘बोलंदाजी’! मिताली राजनं पिच रिपोर्टसाठी घेतली गुगल ‘जेमिनी’ची मदत, अन्...
9
आता भारतातच मिळणार जागतिक दर्जाचे शिक्षण; ब्रिटनची 9 विद्यापीठे उघडणार कॅम्पस
10
UNSC मध्ये भारताला ब्रिटनचा पाठिंबा! मुक्त व्यापार करारावर शिक्कामोर्तब; खलिस्तानवाद्यांवर कारवाईची मागणी
11
रस्त्यावर बेशुद्ध अवस्थेत सापडली महिला; शुद्धीवर आल्यावर सांगितलं असं; ऐकून सगळेच चक्रावले!
12
शाब्बास रिचा! सेंच्युरी हुकली; पण 'नॉट रिचेबल' वाटणारा टप्पा गाठला अन् मोठा डावही साधला
13
रावळपिंडी चिकन टिक्का, बहावलपूर नान, तर..., हवाई दलाच्या मेन्यू कार्डमधून पाकिस्तानची खिल्ली
14
शुभमन गिलच्या कर्णधारपदावर सौरव गांगुलींचे मोठे विधान, म्हणाला...
15
वारंवार मागणी केल्याने डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्कार मिळेल? शर्यतीत कोण? जाणून घ्या...
16
'आम्ही सगळेच स्तब्ध झालो होतो, पण आता...', बूट फेकण्याच्या घटनेवर CJI गवई स्पष्टच बोलले
17
रोहित पवारांच्या मातोश्रींकडून गुंड निलेश घायवळचे कौतुक; सचिन घायवळसोबतचेही फोटो आणले समोर
18
Crime: एकाच कुटुंबातील तिघांवर प्राणघातक हल्ला, ५०० सीसीटीव्हीच्या मदतीने हल्लेखोराला अटक
19
ई-बस प्रवाशांसाठी STकडून मासिक, त्रैमासिक पास योजना सुरू; प्रताप सरनाईकांनी दिली माहिती
20
महिलांसाठी आनंदाची बातमी! 'या' राज्यात आता १२ दिवसांची मासिक पाळी रजा मिळणार, सरकारची घोषणा

संशोधकाने अभ्यासला भारतातील रात्रौ प्रकाश

By admin | Updated: January 31, 2016 00:40 IST

अमेरिकेच्या एका संशोधकाने गेल्या २० वर्षांत उपग्रहाद्वारे दररोज रात्री घेतलेल्या छायाचित्रांचे अध्ययन करून भारतात विजेमुळे पडणाऱ्या प्रकाशाच्या इतिहासाला लेखणीद्वारे उद्धृत केले आहे.

वॉशिंग्टन : अमेरिकेच्या एका संशोधकाने गेल्या २० वर्षांत उपग्रहाद्वारे दररोज रात्री घेतलेल्या छायाचित्रांचे अध्ययन करून भारतात विजेमुळे पडणाऱ्या प्रकाशाच्या इतिहासाला लेखणीद्वारे उद्धृत केले आहे. प्रसिद्धीमाध्यमांसाठी जारी करण्यात आलेल्या एका पत्रकात ही माहिती देण्यात आली आहे. त्यात म्हटले आहे की, मिशिगन विद्यापीठातील राज्यशास्त्राचे प्रोफेसर ब्रियान मिन यांनी जवळपास ८ हजार रात्रीतील ६ लाखांपेक्षा जास्त गावांतून येणाऱ्या प्रकाशाची उपग्रहातून घेण्यात आलेली छायाचित्रे आणि ४.४ अब्ज डाटा बिंदूंना जोडले आहे. मिन म्हणाले की, हा प्रकल्प भारतातील गावांत आलेल्या प्रकाशातील नाट्यमय बदल दाखवितो. पंजाब आणि हरियाणा येथील ग्रामीण भागात प्रकाशाचे प्रमाण वाढले आहे. उत्तराखंड, उत्तर प्रदेश आणि बिहार यासारख्या राज्यांत प्रकाशाचे प्रमाण वाढण्याची गती मंद आहे. १९९३ ते २०१३ या काळात गावात विजेसाठी गोबर गॅसचा वापर कमी झाला असून, रॉकेलवरील दिव्यांचा वापरही कमी झाला आहे. मात्र, अजूनही मोठा भूभाग अंधारातच राहतो.या अभ्यासातून निघालेले निष्कर्ष विश्व बँक, यू एस नॅशनल ओशियानिक अँड अ‍ॅटमॉसफेरिक अ‍ॅडमिनिस्ट्रेशन अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट सीड यांच्या सहकार्याने बनविण्यात आलेली वेबसाईट नाईट लाईटस्डॉट आयओवर टाकण्यात आले आहेत. (वृत्तसंस्था)विद्यापीठाने म्हटले आहे की, विजेमुळे प्रकाशित करणाऱ्या प्रकल्पांवर होणाऱ्या परिणामांचा अद्भुत पैलू यातून दिसतो. याद्वारे प्रयोगकर्ते राज्य आणि जिल्हा स्तरावरील प्रगती पाहू शकतात. त्यातून गेल्या दोन दशकांत झालेले बदलही दिसून येतात.मिन म्हणाले की, विजेमुळे मिळणाऱ्या प्रकाशाने गावांवर काय परिणाम झाला हे ग्रामीण भागातील लोकांनाही चित्राद्वारे कळू शकते.