Refugee boat capsized in Atlantic Ocean; 58 deaths | अटलांटिक महासागरात स्थलांतरितांची बोट बुडाली; 58 जणांचा मृत्यू
अटलांटिक महासागरात स्थलांतरितांची बोट बुडाली; 58 जणांचा मृत्यू

डकार : अटलांटिक महासागरामध्ये शरणार्थ्यांनी भरलेली एक बोट उलटली. यामध्ये 58 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण बेपत्ता झाले आहेत. हे शरणार्थी बोटीतून युरोपला जात होते. सर्वजन पश्चिम ऑफ्रिकेतील गाम्बिया देशाचे आहेत. 


वृत्तसंस्था एपीने सांगितले की, 150 च्या आसपास लोक या बोटीतून प्रवास करत होते. यापैकी 83 जणांनी पोहून जीव वाचविला आहे. घटनेची माहिती मिळताच  युएन मायग्रेशन एजन्सीने बचावकार्य सुरू केले. आतापर्यंत 58 जणांचे मृतदेह सापडले असून मृतांची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. 


शरणार्थींसाठी काम करणाऱ्या या एजन्सीने सांगितले की, यंदाचा हा मोठा अपघात आहे. अटलांटिक महासागरात पश्चिम ऑफ्रिकेतील मॉरिटानिया या देशाच्या जवळ आल्यावर बोटीतील इंधन संपले होते. 


वाटलेल्या लोकांनी सांगितले की, बोटीमध्ये मोठ्या संख्येने महिला आणि मुले प्रवास करत होत्या. ही बोट 27 नोव्हेंबरला सेनेगलच्या शेजारील गाम्बिया देशातून युरोपला निघाली होती. 

English summary :
A boat full of refugees overturned in the Atlantic Ocean. Of these, 58 have died and many have gone missing. These refugees were travelling to Europe by boat.


Web Title: Refugee boat capsized in Atlantic Ocean; 58 deaths

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.