शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
2
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
3
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
4
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
5
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
6
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
7
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
8
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
9
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
10
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
11
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
12
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
13
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
14
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
15
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
16
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
17
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
18
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
19
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
20
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 

इबोलाविरुद्ध लढण्यासाठी मिळालेल्या 60 लाख डॉलर्सवर रेडक्रॉसच्या कर्मचाऱ्यांचा डल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: November 07, 2017 12:00 PM

संपुर्ण जगाचा थरकाप उडवणाऱ्या इबोलाविरोधात लढण्यासाठी मिळालेल्या लक्षावधी डॉलर्सच्या निधीमध्ये आपल्याच कर्मचाऱ्यांनी भ्रष्टाचार केल्याची कबूली रेडक्रॉसने दिली आहे.

ठळक मुद्दे2014 साली इबोलाची साथ पश्चिम आफ्रिकेमध्ये आली होती. सलग दोन वर्षे इबोलाची साथ तेथे राहिली. सिएरा लिओन, लायबेरिया, गिनी या देशांमध्ये 11 हजार लोकांचे प्राण यामुळे गेले होते.

डाकार- संपुर्ण जगाचा थरकाप उडवणाऱ्या इबोलाविरोधात लढण्यासाठी मिळालेल्या लक्षावधी डॉलर्सच्या निधीमध्ये आपल्याच कर्मचाऱ्यांनी भ्रष्टाचार केल्याची कबूली रेडक्रॉसने दिली आहे. रेडक्रॉसने केलेल्या अंतर्गत तपासामध्ये या निधीचा भ्रष्टाचार झाल्याचे स्पष्ट झाले आहे. सिएरा लिओनमध्ये 21 लाख डॉलर्स रुपये संघटनेच्या कर्मचाऱ्यांनी स्थानिक बॅंक अधिकाऱ्यांशी संगनमताने स्वतःच्या खिशात घातल्याचे दिसून आले तर गिनीमध्ये खोट्या आणि मोठ्या रकमेच्या बिलांच्या पावत्या दाखवून 10 लाख रुपयांचा अपहार झाल्याचे स्पष्ट झाले आहे.इबोलावर नियंत्रण आणण्यासाठी रेडक्रॉसने मागवलेल्या साहित्यामध्ये लायबेरियामध्येही 26 लाख रुपयांचा अपहार झाल्याचे सांगण्यात येते. पश्चिम आफ्रिकेमध्ये वेगाने पसरणाऱ्या भयावह अशा इबोलावर नियंत्रण आणण्यासाठी रेडक्रॉसने लक्षावधी डॉलर्सचा निधी जमा केला होता. हा निधी लोकांवर उपचार करण्यासाठी, उपचार साहित्य तसेच पुनर्वसन अशा बाबींसाठी वापरण्यात येणार होता. पण आता त्यात मोठा अपहार झाल्याचे लक्षात येताच सर्व जगाचे लक्ष इबोलाने नव्याने नव्या रुपात वेधून घेतले आहे.2014 साली इबोलाची साथ पश्चिम आफ्रिकेमध्ये आली होती. सलग दोन वर्षे इबोलाची साथ तेथे राहिली. सिएरा लिओन, लायबेरिया, गिनी या देशांमध्ये 11 हजार लोकांचे प्राण यामुळे गेले होते. गेल्या काही वर्षांमध्ये जगाने विविध रोगांचा सामना केला मात्र इबोला पसरण्याचा वेग, त्याचे भयावह स्वरुप यामुळे सर्वच देश चिंतेत पडले होते. पश्चिम आफ्रिकेतील देशांमधून आपल्याकडे येणाऱ्या विमानांची तसेच जहाजांची तपासणी करुन इबोलाचे विषाणू पसरू नयेत याची खबरदारी घेतली होती तर संशयीत रुग्णांना क्वारंटाईनमध्येच ठेवणे योग्य मानले होते.

इबोला : अख्खा देश 4 दिवस बंद

रेडक्रॉसने लोकांवर उपचार, मृतदेहांची विल्हेवाट, लोकांना इबोलाविरोधात लढण्यासाठी शिक्षण देणे यासाठी 6 हजार कर्मचारी नेमले होते तर साथीच्या एकूण काळामध्ये 1.24 कोटी डॉलर्सच्या निधीची उलाढाल रेडक्रॉसतर्फे झाली होती. आता भ्रष्टाचार करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर रेडक्रॉस कशाप्रकारे कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.