इबोला : अख्खा देश 4 दिवस बंद

By admin | Published: September 7, 2014 02:22 AM2014-09-07T02:22:28+5:302014-09-07T02:22:28+5:30

सर्वाधिक प्रभावित देशांपैकी एक असलेल्या सियेरा लिओनने यास अटकाव करण्यासाठी चार दिवस बंद पाळण्याची घोषणा केली आहे.

Ebola: The entire country is closed for 4 days | इबोला : अख्खा देश 4 दिवस बंद

इबोला : अख्खा देश 4 दिवस बंद

Next
जिनिव्हा : पश्चिम आफ्रिकेत प्राणघातक विषाणू इबोलाच्या संक्रमणाने सर्वाधिक प्रभावित देशांपैकी एक असलेल्या सियेरा लिओनने यास अटकाव करण्यासाठी चार दिवस बंद पाळण्याची घोषणा केली आहे. येत्या 18 ते 21 सप्टेंबरदरम्यान लोकांनी घर सोडून बाहेर जाण्यास बंदी राहील, अशी माहिती वरिष्ठ अधिका:यांनी दिली.
इबोला साथीला आळा घालण्याच्या उद्देशाने सरकारने देश बंदचे आवाहन केले आहे. या विषाणूच्या अचानक झालेल्या प्रकोपाने पश्चिम आफ्रिकेतील देशांमध्ये आतार्पयत 2,1क्क् हून अधिक लोकांचा बळी गेला आहे. मृतांत सियेरा लिओन, लायबेरिया, गिनी आणि नायजेरिया या देशांतील नागरिकांचा समावेश आहे.
जागतिक आरोग्य संघटना अर्थात डब्ल्यूएचओने सर्व तपासण्या पूर्ण झाल्यानंतरच नोव्हेंबरपासून इबोला संक्रमणास अटकाव करणा:या लसीचा वापर आरोग्य कर्मचा:यांसाठी केला जाईल, अशी घोषणा शुक्रवारी        केली. 
मार्चमध्ये इबोलाच्या साथीला प्रारंभ झाल्यापासून आतार्पयत सियेरा लिओनमध्ये जवळपास 2क् हून अधिक डॉक्टरांना जीव गमवावा लागला आहे.
उल्लेखनीय म्हणजे, इबोला साथ रोखण्यासाठी गेल्या महिन्यात लायबेरियाची राजधानी मॉनरोवियाच्या झोपडपट्टय़ाही आठवडाभराहून अधिक काळासाठी बंद करण्यात आल्या होत्या. 
(वृत्तसंस्था)
 

 

Web Title: Ebola: The entire country is closed for 4 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.