शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

Rahid khan vs Taliban: तालिबानचं नवीन फर्मान! मुलींच्या शिक्षणावर घातली बंदी; राशिद खानने उठवला आवाज  

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2022 12:47 IST

Afghanistan: तालिबानने अफगाणिस्तानची सत्ता काबीज करून आता एक वर्षाहून अधिक काळ लोटला आहे. 

नवी दिल्ली : तालिबाननेअफगाणिस्तानची सत्ता काबीज करून आता एक वर्षाहून अधिक काळ लोटला आहे. अफगाणिस्तानाततालिबान दररोज नवनवीन फर्मान काढत आहे. अशातच तालिबानने आणखी एक फर्मान काढले आणि सर्वत्र चर्चा रंगली. तालिबानच्या नव्या आदेशानुसार अफगाण मुलींच्या विद्यापीठीय शिक्षणावर अनिश्चित काळासाठी बंदी घालण्यात आली आहे. उच्च शिक्षण मंत्र्यांच्या पत्रानुसार तालिबानने अफगाणिस्तानातील मुली आणि महिलांसाठी चालवली जाणारी विद्यापीठे बंद करण्याची घोषणा केली आहे.

दरम्यान, तालिबानने घेतलेल्या या निर्णयावर अफगाणिस्तानचा क्रिकेटपटू राशिद खानने नाराजी व्यक्त केली आहे. राशिद खानने ट्विटच्या माध्यमातून 'अफगाणिस्तानच्या मुलींना शिकू द्या' अशा शब्दांत आवाज उठवला आहे. खरं तर मंगळवारी उच्च शिक्षण मंत्री नेदा मोहम्मद नदीम यांनी स्वाक्षरी केलेल्या पत्रात पुढील सूचना मिळेपर्यंत महिलांचे शिक्षण स्थगित करण्याच्या आदेशाची अंमलबजावणी करावी असे सांगण्यात आले आहे.

3 महिन्यांपूर्वी झाली होती डमिशन टेस्ट दरम्यान, 3 महिन्यांपूर्वीच संपूर्ण अफगाणिस्तानातील हजारो मुलींनी विद्यापीठांमध्ये आयोजित केलेली डमिशन टेस्ट दिली होती. त्यानंतर लगेचच हा आदेश आला. या नव्या आदेशानंतर अफगाणिस्तानातील हजारो मुलींचे भविष्य अंधारात जाण्याची शक्यता आहे. 

अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यानंतर तालिबानने महिला आणि मुलींच्या शिक्षणाबाबत फर्मान काढले होते. यामध्ये महिला व मुलींना पुरुषांच्या शाळेत शिकता येणार नाही, असे सांगण्यात आले. यासोबतच मुलींना केवळ महिला शिक्षिकाच शिकवू शकतील. तसेच तालिबान सरकारने महिलांना जिममध्ये जाण्यास बंदी घातली होती. एक वर्षापूर्वी तालिबानने सत्ता हाती घेतल्यापासून हा हुकूम महिलांचे हक्क आणि स्वातंत्र्य हिरावून घेणारा आहे. तालिबानच्या आदेशाबाबत महिलांनीही अनेकवेळा निषेध देखील नोंदवला आहे.  

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

टॅग्स :Afghanistanअफगाणिस्तानTalibanतालिबानWomenमहिलाEducationशिक्षण