शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

नेपाळमध्ये 'रॅपर राज': बालेन शाह बनले देशाचे सर्वात तरुण पंतप्रधान; 'जेन-झी' क्रांतीनं जुनी सत्ता उलथवली

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2026 14:16 IST

विशेष म्हणजे, या सोहळ्यात हिंदू आणि बौद्ध परंपरांचा अप्रतिम संगम बघायला मिळाला. यावेळी, ब्राह्मणांनी शंखनाद केला, १०८ युवा ब्राह्मणांनी स्वस्ती वाचन केले तसेच 107 लामांनी बौद्ध मंत्रांचे पठण केले.  

काठमांडू नेपाळच्या राजकारणात आज एका ऐतिहासिक पर्वाला सुरुवात झाली. प्रसिद्ध रॅपर तथा इंजिनीअर बालेन शाह यांनी शुक्रवारी नेपाळच्यापंतप्रधानपदाची शपथ घेतली. ते वयाच्या अवघ्या ३५ व्या वर्षी देशाचे सर्वात तरुण पंतप्रधान झाले आहेत. विशेष म्हणजे, मदेश क्षेत्रातून या सर्वोच्च पदावर पोहोचणारे ते पहिलेच लोकप्रतिनिधी आहेत. 

राष्ट्रपती राम चंद्र पौडेल यांच्या उपस्थितीत 'शीतल निवास' येथे दुपारी १२:३४ वाजता त्यांचा शपथविधी सोहळा पार पडला. विशेष म्हणजे, या सोहळ्यात हिंदू आणि बौद्ध परंपरांचा अप्रतिम संगम बघायला मिळाला. यावेळी, ब्राह्मणांनी शंखनाद केला, १०८ युवा ब्राह्मणांनी स्वस्ती वाचन केले तसेच 107 लामांनी बौद्ध मंत्रांचे पठण केले.  

१८२ जागांसह सत्तेत एन्ट्री -नेपाळमध्ये ५ मार्च रोजी झालेल्या निवडणुकीत बालेन शाह यांच्या पक्षाने ऐतिहासिक कामगिरी केली. एकूण २७५ जागांपैकी तब्बल १८२ जागा जिंकत त्यांनी नेपाळच्या राजकारणातील जुन्या प्रस्थापितांना धूळ चारली. मधेश भागातून देशाच्या सर्वोच्च कार्यकारी पदावर पोहोचणारे ते पहिलेच व्यक्ती ठरले आहेत. गुरुवारी त्यांची संसदीय दलाचे नेते म्हणून निवड करण्यात आली आणि आज (२७ मार्च) त्यांचा शपथविधी पार पडला. हा विजय म्हणचे 'जेन-झी' (Gen-Z) पिढीच्या क्रांतीचा विजय मानला जात आहे.

कोण आहेत बालेन शाह?बालेन हे राष्ट्रीय स्वतंत्र पार्टी (RSP) चे नेते आहेत. काठमांडूचे माजी महापौर राहिलेले बालेन शाह हे व्यवसायाने इंजिनीअर असून रॅप गाण्यांच्या माध्यमातून भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठवण्यासाठी ओळखले जातात. सहा महिन्यांपूर्वी भ्रष्टाचाराविरोधात उसळलेल्या जनआंदोलनानंतर त्यांनी तरुणांचे नेतृत्व केले. आता बालेन हे, १५ ते १८ मंत्र्यांचे छोटे मंत्रिमंडळ स्थापन करण्याच्या तयारीत आहेत. नेपाळची अर्थव्यवस्था सुधारणे आणि भ्रष्टाचारावर अंकुश ठेवणे हे बालेन सरकार समोरील मोठे आव्हान असेल. नेपाळमधील पारंपरिक घराणेशाही मोडीत काढून एका रॅपरच्या हाती देशाची कमान येणे, हा तेथील राजकारणातील सर्वात मोठा बदल मानला जात आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Rapper Balen Shah Becomes Nepal's Youngest PM, Overthrowing Old Guard

Web Summary : Rapper-engineer Balen Shah, 35, became Nepal's youngest PM, marking a shift. His party won 182 seats, defeating established politicians. Shah aims to tackle corruption and improve Nepal's economy, signaling a Gen-Z revolution.
टॅग्स :Nepalनेपाळprime ministerपंतप्रधान