राम नवमीचा मुहुर्त, हिंदू रीतीरिवाजांनुसार होणार नेपाळचे नवे पंतप्रधान बालेंद्र शाहांचा शपथविधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2026 19:17 IST2026-03-25T19:16:50+5:302026-03-25T19:17:20+5:30

Nepal News: नेपाळमध्ये नुकत्याच झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत बालेंद्र शाह आणि त्यांच्या पक्षाने दणदणीत विजय मिळवला होता. त्यानंतर आता बालेंद्र शाह हे नेपाळचे पंतप्रधान म्हणून शपथ घेणार आहेत. शुक्रवार २७ मार्च रोजी राम नवमीच्या मुहुर्तावर बालेंद्र शाह यांचा शपथविधी होणार आहे.

Ram Navami Muhurta, Nepal's new Prime Minister Balendra Shah's swearing-in ceremony will be held according to Hindu rituals | राम नवमीचा मुहुर्त, हिंदू रीतीरिवाजांनुसार होणार नेपाळचे नवे पंतप्रधान बालेंद्र शाहांचा शपथविधी

राम नवमीचा मुहुर्त, हिंदू रीतीरिवाजांनुसार होणार नेपाळचे नवे पंतप्रधान बालेंद्र शाहांचा शपथविधी

नेपाळमध्ये नुकत्याच झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत बालेंद्र शाह आणि त्यांच्या पक्षाने दणदणीत विजय मिळवला होता. त्यानंतर आता बालेंद्र शाह हे नेपाळचे पंतप्रधान म्हणून शपथ घेणार आहेत. शुक्रवार २७ मार्च रोजी राम नवमीच्या मुहुर्तावर बालेंद्र शाह यांचा शपथविधी होणार आहे. तसेच या शपथविधीवर हिंदू रीतीरिवाजांची छाप दिसणार आहे. या शपथविधी सोहळ्याची तयार नेपाळची राजधानी असलेल्या काठमांडू येथे सुरू आहेत.

या शपथविधीसाठी शुक्रवार चैत्र नवरात्रीमधील श्रीराम नवमीची तिथी निश्चित करण्यात आली आहे. तसेच हा शपथविधी स्थानिक वेळेनुसार दुपारी १२ वाजून ४४ मिनिटांनी होणार आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे यावेली अयोध्येतील राम मंदरामध्ये राम नवमीच्या मुहुर्तावर विशेष पूजा होणार आहे. राष्ट्रपती भवन शीतल निवासकडून पाठवण्यात आलेल्या शपथविधीच्या निमंत्रण पत्रिकेमध्ये बालेंद्र शाह याच शुभ मुहूर्तावर शपथ घेणार हे निश्चित झाले आहे.

गतवर्षी नेपाळमध्ये जेन झेड क्रांती झाली होती. तसेच या आंदोलनामुळे तेथील सरकार विसर्जित करावे लागले होते. त्यानंतर देशाचं नेतृत्व काळजीवाहू सरकारने केलं. तसेच नव्याने घेण्यात आलेल्या निवडणुकांमध्ये बालेंद्र शाह आणि त्यांच्या नेतृत्वाखालील पक्षाने विजय मिळवला होता.

Web Title : राम नवमी पर नेपाल के नए प्रधानमंत्री बालेंद्र शाह लेंगे शपथ

Web Summary : बालेंद्र शाह 27 मार्च को राम नवमी पर नेपाल के प्रधानमंत्री के रूप में शपथ लेंगे। समारोह में हिंदू रीति-रिवाजों को शामिल किया जाएगा और यह काठमांडू में दोपहर 12:44 बजे स्थानीय समय पर आयोजित किया जाएगा। यह हाल के चुनावों में शाह की पार्टी की राजनीतिक उथल-पुथल के बाद जीत के बाद हुआ है।

Web Title : Nepal's New Prime Minister Balendra Shah to be Sworn in on Ram Navami

Web Summary : Balendra Shah will be sworn in as Nepal's Prime Minister on Ram Navami, March 27th. The ceremony will incorporate Hindu rituals and will be held in Kathmandu at 12:44 PM local time. This follows Shah's party's victory in recent elections after political turmoil.