रशियात चिनी संरक्षणमंत्र्यांचा अपमान?; राजनाथ सिंहांना मात्र सगळ्याच व्यासपीठांवर खास स्थान
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2020 16:43 IST2020-09-05T16:35:03+5:302020-09-05T16:43:05+5:30
चिनी संरक्षणमंत्र्यांकडे रशियाच्या लष्करी अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष; राजनाथ सिंह यांच्या आसपास मात्र मोठ्या संख्येनं अधिकारी उपस्थित

रशियात चिनी संरक्षणमंत्र्यांचा अपमान?; राजनाथ सिंहांना मात्र सगळ्याच व्यासपीठांवर खास स्थान
मॉस्को: पूर्व लडाखमधील तणाव गेल्या चार महिन्यांपासून कायम असताना संरक्षणमंत्री राजनाथ सिंहरशिया दौऱ्यावर आहेत. विशेष म्हणजे चीनचे संरक्षणमंत्री वेई फेंगहीदेखील रशियाच्या दौऱ्यावर आहेत. मात्र दौऱ्यादरम्यान सर्व व्यासपीठांवर फेंगही यांच्या तुलनेत सिंह यांना जास्त प्राधान्य मिळालं आहे. सिंह यांचं रशियात झालेलं स्वागत पाहता यजमान देशानं चीनच्या तुलनेत भारतासोबतच्या मैत्रीला जास्त महत्त्व दिल्याचं स्पष्ट झालं आहे.
रशियासोबत मोठी डील! लडाखमध्ये लढण्यासाठी खतरनाक AK-47 203 मिळणार
रशिया दौऱ्यादरम्यान संरक्षणमंत्री राजनाथ सिंह विविध बैठकांना उपस्थित होते. यावेळी वेई फेंगही सगळ्याच ठिकाणी त्यांच्या मागून चालताना दिसत होते. सिंह आणि फेंगही एकाचवेळी सैन्य स्मारकाजवळ पुष्पचक्र वाहण्यासाठी गेले. त्यावेळी रशियाच्या लष्कराचे अधिकारी सिंह यांच्या दोन्ही बाजूंना उपस्थित होते. मात्र फेंगही यांना इतकं महत्त्व दिलं गेलं नाही. फेंगही यांच्यासोबत रशियाचे फारसे अधिकारी नव्हते. फेंगही यांच्यासोबत पाकिस्तानचे जनरलदेखील चालत होते. मात्र त्यांच्याकडेही अधिकाऱ्यांनी लक्ष दिलं नाही. रशियन लष्कराच्या अधिकाऱ्यांचं संपूर्ण लक्ष राजनाथ सिंह यांच्याकडेच होतं.
शत्रुत्वापेक्षा माणुसकी मोठी; भारतीय जवान धावले चिनी नागरिकांसाठी, १७५०० फुटांवरून सुखरुप सुटका
एससीओच्या बैठकीआधी राजनाथ सिंह यांच्यासह सर्वच देशांचे संरक्षणमंत्री एका चर्चमध्ये गेले. या ठिकाणीही चिनी संरक्षणमंत्री फेंगही दुर्लक्षितच राहिले. लष्कराच्या सर्वात मोठ्या चर्चमध्येही फेंगही यांच्याकडे कोणी लक्ष दिलं नाही. यावेळी रशियाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्यासोबत होते. रशियन संरक्षणमंत्री केवळ राजनाथ सिंहांशी बोलत होते. यावेळी चिनी संरक्षणमंत्री मागून चालत होते.
भारताचा चीनला आणखी एक धक्का; 'त्या' औषधावर आता अँटी-डंपिंग ड्युटी लागणार
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी चिनी संरक्षणमंत्र्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं होतं. रशियाच्या संरक्षणमंत्र्यांनीदेखील तेच केलं. विशेष म्हणजे चीन एससीओचा संस्थापक सदस्य आहे. तर भारत २०१७ मध्ये एससीओचा सदस्य झाला आहे. मात्र तरीही रशियाच्या संरक्षणमंत्र्यांनी चीनकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून केवळ भारतीय संरक्षणमंत्र्यांना प्राधान्य दिलं. राजनाथ सिंह रशियातील प्रत्येक व्यासपीठावर चिनी संरक्षणमंत्र्यांशी अंतर राखून होते.