कतारची रॉयल फॅमिली देणार डोनाल्ड ट्रम्प यांना सर्वात महागडं गिफ्ट; ४० कोटी डॉलरचं विमान
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2025 11:25 IST2025-05-12T11:24:46+5:302025-05-12T11:25:21+5:30
डोनाल्ड ट्रम्प हे त्यांच्या दुसऱ्या कार्यकाळाच्या शेवटी हे विमान ट्रम्प प्रेसिडेंशियल लायब्रेरी फाऊंडेशनला दान करतील.

कतारची रॉयल फॅमिली देणार डोनाल्ड ट्रम्प यांना सर्वात महागडं गिफ्ट; ४० कोटी डॉलरचं विमान
अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प आजपासून ३ देशांच्या दौऱ्यावर चालले आहेत. यात ते सर्वात आधी सौदी अरबला जाणार असून तिथून पुढे कतार आणि संयुक्त अरब अमीरात(UAE) चा दौरा करणार आहेत. राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांना कतार दौऱ्यात तिथल्या शाही कुटुंबाकडून एक लग्झरी बोईंग एअरक्राफ्ट भेट म्हणून दिले जाणार आहे.
या लग्झरी बोईंग 747-8 जंबो जेट एअरक्राफ्टला Flying Palace ही म्हटलं जाते. याची किंमत जवळपास ४० कोटी डॉलर इतकी आहे. अमेरिकन सरकारला आतापर्यंतच्या कुठल्याही इतर देशातील सरकारकडून मिळालेले हे सर्वात महागडं गिफ्ट आहे. २०२९ पर्यंत राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचा कार्यकाळ पूर्ण होण्याआधी ते या विमानाचा वापर करू शकतील. या विमानाचा तात्पुरते एअरफोर्स वनला पर्याय म्हणून वापरण्याची योजना आहे जे अमेरिकेच्या राष्ट्रपतींचे अधिकृत विमान असते.
डोनाल्ड ट्रम्प हे त्यांच्या दुसऱ्या कार्यकाळाच्या शेवटी हे विमान ट्रम्प प्रेसिडेंशियल लायब्रेरी फाऊंडेशनला दान करतील. त्यानंतर ट्रम्प खासगी वापरासाठीही या विमानाचा वापर करू शकतात. अधिकृतपणे याची घोषणा पुढील आठवड्यात होण्याची शक्यता आहे. या आठवड्यात ट्रम्प यांच्या दौऱ्यावेळी कतारकडून हे विमान भेट मिळणार नाही असेही व्हाईट हाऊसच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. डोनाल्ड ट्रम्प यांनीही या भेटीची पुष्टी केली आहे. अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाला कुठल्याही अतिरिक्त शुल्काशिवाय एक भेट मिळणार आहे. हे ७४७ एअरक्राफ्ट आहे. ज्याचा वापर तात्पुरत्या स्वरुपात ४० वर्ष जुन्या एअरफोर्स वनच्या जागी केला जाईल असं त्यांनी सांगितले.
दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांनी या Flying Palace मधून मसय दौरा केला होता. जेव्हा हे विमान फेब्रुवारीत वेस्ट पाम बीचवर आंतरराष्ट्रीय एअरपोर्टवर पार्क होते. या एअरक्राफ्टला सुरुवातीलाच अमेरिकेन एअरफोर्सला दिले जाईल. जे १३ वर्ष जुन्या या एअरक्राफ्टला अमेरिकन राष्ट्रपतींच्या सुरक्षा आणि सुविधांनी युक्त विमानात रुपांतरीत करणार आहे. त्यानंतर हे विमान ट्रम्प प्रेसिडेशियल लायब्रेरी फाऊंडेशनला दिले जाईल.