प्रिन्सवर लावला होता अल्पवयीनला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याचा आरोप, एक्स वाइफचा आढळला मृतदेह
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2022 17:03 IST2022-06-02T17:01:29+5:302022-06-02T17:03:13+5:30
Ex-Qatar Princess found dead in Spain home: फ्रेंच वृत्तपत्र Le Parisien मध्ये प्रकाशित रिपोर्टनुसार, गलानिओचा मृत्यू ड्रग्सच्या ओव्हरडोसमुळे झाला आहे.

प्रिन्सवर लावला होता अल्पवयीनला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याचा आरोप, एक्स वाइफचा आढळला मृतदेह
Ex-Qatar Princess found dead in Spain home: कतारचा राजकुमार अब्दुल अजीज बिन खलीफा अल थानी (Abdelaziz bin Khalifa Al-Thani) ची तिसरी पत्नी कासिया गलानिओ (Kasia Gallanio) तिच्या स्पेनमधील घरात मृतावस्थेत आढळून आली. हायप्रोफाइल प्रकरण असल्याने पोलीस वेगवेगळ्या वळणांनी या प्रकरणाची चौकशी करत आहेत.
फ्रेंच वृत्तपत्र Le Parisien मध्ये प्रकाशित रिपोर्टनुसार, गलानिओचा मृत्यू ड्रग्सच्या ओव्हरडोसमुळे झाला आहे. तेच कासियाच्या या संशयास्पद मृत्यूच्या टायमिंगमुळेही प्रश्नचिन्ह उपस्थित राहत आहेत. कासियाचं वय ४५ वर्षे होतं. तिची घटस्फोटीत पतीसोबत मुलांच्या कस्टडीबाबत केस सुरू होती. अब्दुल बिन खलीफा अल थानी कतारचा वर्तमान अमीरचा काका आहे.
कौटुंबिक सूत्रांनुसार, बराचवेळ तिने फोन उचलाल नाही तेव्हा पोलिसांना सूचना देण्यात आली. यानंतर पोलिसांची टीम मार्बेला येथील अपार्टमेंटमध्ये पोहोचली तेव्हा कासियाचा मृतदेह बेडवर पडला होता. पोलीस म्हणाले की, 'प्राथमिक चौकशीत मृत्यूचं कारण ड्रग्सचा ओव्हरडोस हेच समोर आलं. पोस्टमार्टेनंतरच सगळं काही स्पष्ट होईल'.
कासिया मृत्यू अशावेळी झाला जेव्हा तिने नुकतेच घटस्फोटीत पतीवर आरोप लावला होता की, त्याने एका अल्पवयीन मुलीला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला होता. मात्र, प्रिन्स अब्दुल अजीज बिन खलीफाने तिचे आरोप निराधार आणि खोटे असल्याचं म्हटलं होतं. कासिया १७ वर्षीय जुळ्या मुलींची आहे आहे. आधी मुली आपल्या वडिलांच्या घरी राहत होत्या नंतर त्या आपल्या आईकडे आल्या.