शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! लडाखच्या पूर्ण राज्यासाठी लेह पेटले; सोनम वांगचूक म्हणाले, हा तरुणांचा राग होता, GenZ क्रांती...
2
उद्धव ठाकरेंचा दौरा ठरला; पुराचा फटका बसलेल्या 'या' पाच जिल्ह्यांत करणार पाहणी
3
Leh Protest: लेहमध्ये आंदोलनाला हिंसक वळण, भाजप कार्यालय पेटवले, सोनम वांगचुक १५ दिवसांपासून उपोषणावर
4
"एमबीबीएससाठी वेळ आणि पैसे करण्यापेक्षा मला...", अनुरागने घरातच स्वतःला संपवले, चिठ्ठीमध्ये काय?
5
"योगी स्वतःला पीएम मोदींचा उत्तराधिकारी समजतात...!"; CWC च्या बैठकीत खर्गेंचा मोठा हल्ला, नीतीश कुमारांसाठी असा शब्द वापरला
6
२०२७ पर्यंत युनायटेड अमेरिकेचं विभाजन? ट्रम्प ठरणार USAचे शेवटचे राष्ट्राध्यक्ष! मोठे भाकित...
7
मराठी अभिनेत्रीचं "न्यूड" फोटोशूट; सौंदर्य पाहून चाहते प्रेमात, करत आहेत कौतुक
8
नवरात्री २०२५: १२५ वर्ष जुने कोकणातले पंचमुखी गायत्री मंदिर पाहिले का? मंत्रमुग्ध करणारी मूर्ती आणि इतिहास 
9
अश्विनची लवकरच क्रिकेटमध्ये नवी इनिंग; आता पाकिस्तानी क्रिकेटरसोबत एकाच संघात खेळणार!
10
पुण्यातील रविवार पेठेत शुकशुकाट; ऐन नवरात्रीत घागरा, ड्रेस घ्यायला महिलावर्ग येईना..., व्यापाऱ्यांत कुजबुज...
11
Maharashtra Rain Update: पुढील चार दिवस विदर्भात वारे, विजांसह मुसळधार पावसाचा इशारा; बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा
12
15 मुलींची छेडछाड केल्याचा आरोप, स्वामी चैतन्यानंद सरस्वती फरार; Volvo कार जप्त
13
Volvo EX30: एका चार्जवर ४८० किमी धावणार; वोल्वोची बहुप्रतीक्षित इलेक्ट्रिक कार भारतात लॉन्च!
14
GST कपातीचा फायदा मिळत नाहीये? टोल-फ्री नंबर किंवा व्हॉट्सअॅपवर करू शकता थेट तक्रार
15
Mumbai Crime: हाताच्या नसा कापल्या गेल्या अन्... पोलिसाच्या मृत्युचे कोडे उलगडले; पत्नी, मुलाला अटक
16
३.७ कोटी देऊन बॉयफ्रेंडच्या पत्नीसोबत केली तडजोड, पण नंतर घडलं असं काही, पैसेही गेले आणि... 
17
Gold Silver Price 24 September: नवरात्रीत सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण, आता खरेदी करावं की आणखी स्वस्त होण्याची वाट पाहावी?
18
जगातील सर्वात मोठ्या मुस्लीम देशाच्या राष्ट्रपतीनं UN महासभेत म्हटलं, "ॐ  शांति ओम..." 
19
कोणतेही अधिकचे निकष न लावता दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत करणार, मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2025 01:01 IST

America Entry in Israel Iran War: कतारच्या हवाई संरक्षण दलांनी इराणचा हल्ला यशस्वीरित्या हाणून पाडला, असा दावा करण्यात आला आहे. तसेच कतारमधील भारतीय दूतावासानेही या घडामोडींवर लक्ष ठेवले आहे.

America Entry in Israel Iran War:इस्रायल-इराण यांच्यात पेटलेल्या युद्धात अमेरिकेने उडी घेतली. इराणचा आण्विक कार्यक्रम रोखण्यासाठी इस्रायलने सुरू केलेल्या हल्ल्यांदरम्यान अमेरिकेने इराणच्या तीन आण्विक केंद्रांवर बंकर बस्टर बॉम्बनी हल्ला केला. यानंतर आता इराणने कतारमधील अमेरिकेच्या तळांवर ६ क्षेपणास्त्रे डागली आहेत. यानंतर आता कतार, बहरीन, कुवेत यांनी आपले एअरस्पेस बंद केले आहेत. इराणने प्रत्युत्तरादाखल केलेल्या हल्ल्यांमुळे आखाती देशांतील तणाव वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यातच इराणने केलेल्या हल्ल्याचा कतारने निषेध नोंदवला.

कतारच्या परराष्ट्र मंत्रालयाचे मंत्री आणि अधिकृत प्रवक्ते मजेद अल अन्सारी यांनी एक्सवर एक दीर्घ पोस्ट करत इराण केलेल्या हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध केला. आम्ही हे कृत्य कतारचे सार्वभौमत्व, हवाई क्षेत्र, आंतरराष्ट्रीय कायद्याचे आणि संयुक्त राष्ट्रांच्या नियमांचे उघड उल्लंघन मानतो. आम्ही पुष्टी करतो की, आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार याला थेट प्रत्युत्तर देण्याचा अधिकार कतार राखून ठेवतो. कतारच्या हवाई संरक्षण दलांनी हल्ला यशस्वीरित्या हाणून पाडला आणि इराणी क्षेपणास्त्रे हवेतच रोखली. या हल्ल्यात कोणलाही दुखापत किंवा जीवितहानी झाली नाही याची आम्ही पुष्टी करतो, असे कतारने म्हटले आहे. कतारसह सौदी अरेबियाच्या परराष्ट्र मंत्रालयानेही इराण हल्ल्याचा निषेध केला आहे.

कतारमधील भारतीय दूतावासाने केले महत्त्वाचे आवाहन

सध्याच्या परिस्थिती लक्षात घेता, कतारमधील भारतीय समुदायाला सावधगिरी बाळगण्याचे आणि घरातच राहण्याचे आवाहन कतार दोहा येथील भारतीय दूतावासाने केले आहे. कृपया शांत राहा आणि कतारच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या स्थानिक बातम्या, सूचना आणि मार्गदर्शनाचे पालन करा. भारतीय दूतावास सोशल मीडिया चॅनेलद्वारे घडामोडींबाबत अपडेट करत राहील, असेही कतारमधील दोहा येथील भारतीय दूतावासाच्या अधिकृत एक्स अकाउंटवर पोस्ट करण्यात आले आहे. दुसरीकडे, काही रिपोर्ट्सनुसार, कतार येथील अमेरिकन लष्करी तळांवर इराणने केलेल्या हल्ल्यानंतर इराणमधील स्थानिकांकडून जल्लोष करण्यात आला.

दरम्यान, भारतातील अहमदाबाद, लखनऊ यांसह अनेक विमानतळांनी या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. तसेच एअर इंडिया, इंडिगो, अकासा एअरलाइन अशा विमान कंपन्यांनीही प्रवाशांसाठी सूचना जारी केल्या आहेत. कतार एअरवेजकडूनही सहकार्याचे आवाहन प्रवाशांना करण्यात आले आहे. 

 

टॅग्स :QatarकतारIranइराणAmericaअमेरिकाIsraelइस्रायल