पुतीन म्हणतात, रशियातील सेक्सवर्कर्स सर्वोत्तम

By Admin | Updated: January 18, 2017 11:01 IST2017-01-18T11:01:29+5:302017-01-18T11:01:29+5:30

जगातील अत्यंत मह्त्त्वाकांक्षी, मुत्सद्दी आणि खंबीर नेते म्हणून प्रसिद्ध असलेले रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन एका वादग्रस्त वक्तव्यामुळे

Putin says, the best of the sex workers in Russia | पुतीन म्हणतात, रशियातील सेक्सवर्कर्स सर्वोत्तम

पुतीन म्हणतात, रशियातील सेक्सवर्कर्स सर्वोत्तम

>ऑनलाइन लोकमत 
मॉस्को, दि. 18 - जगातील अत्यंत मह्त्त्वाकांक्षी, मुत्सद्दी आणि खंबीर नेते म्हणून प्रसिद्ध असलेले रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन एका वादग्रस्त वक्तव्यामुळे अडचणीत आले आहेत.  प्रसारमाध्यमांशी बोलताना पुतीन यांनी रशियातील सेक्स वर्कर्स सर्वोत्तम असल्याचे वक्तव्य केले.  त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. 
 अमेरिकेचे नवनियुक्त राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या सेक्स टेपवरून सुरू झालेल्या विवादाविषयी बोलताना पुतीन यांनी हे वक्तव्य केले. त्यादरम्यान त्यांनी ट्रम्प यांच्यावर करण्यात येत असलेले आरोप बिनबुडाचे असल्याचेही सांगितले. प्रसारमाध्यमांशी बोलताना पुतीन म्हणाले, "ट्रम्प एक समजुतदार व्यक्ती आहेत, त्यांचा अनेक वर्षे सौंदर्य स्पर्धांमध्ये सहभाग होता. त्यामाध्यमातून ते जगातील सर्वात सुंदर महिलांना भेटलेले आहेत. त्यामुळे ते कुठल्या हॉटेलात जाऊन  ते सेक्स वर्कर्सना भेटले असावेत, असे मला वाटत नाही. तरीही रशियातील सेक्स वर्कर्स जगात सर्वोत्तम आहेत, हे मान्य करावे लागेल." 
( जागतिक पटलावरील पुतीन यांचा वाढता प्रभाव
 
यावेळी रशियाकडे ट्रम्प यांची सेक्स टेप असल्याचे आपल्याला वाटत नाही असेही त्यांनी सांगितले,  अमेरिकेच्या राष्ट्रपतीविरोधात अशा बातम्या पसरवून त्याचा राजकीय हत्यारासारखा वापर होत असल्याचेही पुतीन म्हाणाले. "हे आरोप म्हणजे निवडणुकीत ट्रम्प यांच्या झालेल्या विजयावरील लोकांचा विश्वास कमी करण्याचे अभियान आहे, असे त्यांनी सांगितले. 
( पुतीन यांचे गायब होणे कैसे दिसे...
 

Web Title: Putin says, the best of the sex workers in Russia