मुख्यमंत्री फडणवीस यांचे लातूरमध्ये श्रमदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2017 11:17 AM2017-05-25T11:17:19+5:302017-05-25T12:34:18+5:30

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निलंगा तालुक्यातील हलगरा येथे श्रमदान केले. श्रमदान केल्यानंतर त्यांनी येथील नागरिकांसोबत संवादही साधला.

Chief Minister Fadnavis in Latur Shramdan | मुख्यमंत्री फडणवीस यांचे लातूरमध्ये श्रमदान

मुख्यमंत्री फडणवीस यांचे लातूरमध्ये श्रमदान

Next
>ऑनलाइन लोकमत
लातूर, दि. 25 - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निलंगा तालुक्यातील हलगरा गावात श्रमदान केले. श्रमदान केल्यानंतर त्यांनी येथील नागरिकांसोबत संवादही साधला. यावेळी पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर, खासदार सुनील गायकवाड, भाजपा जिल्हाध्यक्ष नागनाथ निवडदे हेदेखील उपस्थित होते.
 
 
निलंगा तालुक्यातील हलगरा येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी सकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास हाती टिकाव, खोरे घेऊन श्रमदान केले. राज्यात आजपासून भाजपाच्या वतीने "शाश्वत शेती- समृद्ध शेती" अभियानांतर्गत शिवारसंवाद सभेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी थेट ग्रामस्थांनी संवाद साधत जलयुक्त शिवार अंतर्गत कामाची माहिती जाणून घेतली.
 
यावेळी लातूरचे पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर, खासदार सुनील गायकवाड, भाजप जिल्हाध्यक्ष नागनाथ निडवदे, जिल्हा परिषद अध्यक्ष मिलिंद लातुरे, उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके, जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी माणिक गुरसल आदींची उपस्थिती होती. 
 
गावाच्या पुढाकारातून झालेल्या कामांबाबत मुख्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले. जलयुक शिवाराच्या कामातून गावाचा कसा कायापालट होतो, हेच हलगरा गावातील नागरिकांनी दाखवून दिले आहे. राज्यातील सरकार हे शेतकरी, कष्टकरी यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. राज्यातील इतर गावाची हलगरा गावचा आदर्श घेतला पाहिजे, असेही मुख्यमंत्री यावेळी नागरिकांनी संवाद साधताना म्हणाले. 
 
यावेळी नागरिकांनी विचारलेल्याली प्रश्नांची उत्तरे मुख्यमंत्र्यांनी दिली. आजपासून भाजपाच्या राज्यात शेतशिवार संवाद सभेला सुरुवात झाली असून, हलगरा येथे पहिल्या सभेला मुख्यमंत्र्यांनी गुरुवारी संबोधित केले. हलगरा गावात लोकचळवळ उभारली आहे. यासाठी शासन, सामाजिक संस्थाची मदत मिळाली आहे.  यासाठी गावातील नागरिकांनी 20 पाणी बैठका घेतल्या. 
 
यासाठी परिसरातील 10 गावांतील नागरिकांनी पुढाकार घेत श्रमदान केले आहे. पुढे  मुख्यमंत्र्यांनी फडणवीस हे औराद शहाजानी येथे गेले. येथेही मुख्यमंत्र्यांनी लोकांशी थेट संवाद साधला. त्यानंतर त्यांनी अनसरवाडा गावाला भेट दिली. यावेळी सर्वच विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
 
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे 24 मेपासून लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौ-यादरम्यान निलंगा तालुक्यातील विविध कामांना ते भेटी देऊन पाहणी करणार आहेत.  त्यानिमित्त पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर, जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी खरोसा लेणी, औराद शहाजानी, हलगरा, हंगरगा आदी गावांतील विकास कामांची स्थळ पाहणी केली.
 
ज्या ठिकाणी मुख्यमंत्री भेट देणार होते, त्या सर्व ठिकाणांची स्थळ पाहणी पालकमंत्र्यांनी मंगळवारी केली. औसा तालुक्यातील खरोसा लेणी, निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी, हलगरा येथील श्रमदान ठिकाण, जलयुक्त कामे, अनसरवाडा येथील शेततळ्याच्या कामावर भेट देऊन पालकमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना सूचना केल्या होत्या. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मिलिंद लातुरे, उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके, जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. माणिक गुरसळ, पोलीस अधीक्षक डॉ. शिवाजीराव राठोड, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रतापसिंह कदम, कार्यकारी अभियंता चिश्ती, उपविभागीय अधिकारी भवानजी आगे-पाटील, रामेश्वर रोडगे, तहसीलदार विकास देशमुख आदींची उपस्थिती होती. 
 
नागरिकांसोबत संवाद साधताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 

Web Title: Chief Minister Fadnavis in Latur Shramdan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.