शहरं
Join us  
Trending Stories
1
India- Israel: भारत-इस्रायल मैत्री गतिमान होणार, पंतप्रधान नेतान्याहू भारतात येणार!
2
Aaditya Thackeray: ‘इलेक्शन’ कशाला ‘सिलेक्शन’ करा!' मतदारयादीतील गोंधळावरून आदित्य ठाकरेंचा आयोगावर आरोप
3
Malegaon: 'नराधमाला फाशी द्या !" मालेगाव अत्याचार प्रकरणाचे तीव्र पडसाद, संतप्त जमावाने न्यायालयाचे प्रवेशद्वार तोडले
4
Mumbai: मंगलप्रभात लोढा यांना जीवे मारण्याची धमकी, काँग्रेसच्या अस्लम शेख यांच्याविरोधात तक्रार
5
Thane: श्रेयवादाची लढाई ठाण्यात हातघाईवर, भाजप नेत्याकडून शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण!
6
पंतच्या नेतृत्त्वात भारताची मालिका बचाव मोहीम! IND vs SA 2nd Test मॅच Live Streaming बद्दल सविस्तर
7
Ambernath Accident: अंबरनाथमध्ये निवडणुकीच्या प्रचारादरम्यान शिंदेसेनेच्या उमेदवाराच्या कारला अपघात, ४ ठार!
8
पत्नीही हवाई दलात पायलट, दुबई एअर शोमधील तेजसच्या शहीद पायलटचे लग्नही दुबईलाच झालेले...
9
IT कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! आता दर महिन्याच्या ७ तारखेपर्यंत पगार करावाच लागणार; नव्या कायद्यात काय काय...
10
नवा कामगार कायदा...! आता १ वर्षानंतर मिळणार ग्रॅच्युइटी; ५ वर्षांची अट बदलली...
11
पायलट 'निगेटिव्ह-जी ॲक्रोबॅटिक' युद्धाभ्यास करायला गेला अन्...; दुबई एअर शोमध्ये 'तेजस' विमान अपघाताचे कारण समोर आले...
12
भारतीय ज्युनियर महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकावर लैंगिक छळाचा आरोप; क्रीडा मंत्रालयाने चौकशीचे दिले आदेश
13
“भाजपाच्या रविंद्र चव्हाणांमुळे इथे युती तुटली, कोणता राग आहे माहिती नाही”: निलेश राणे
14
हिडमाचा खात्मा बनावट चकमकीत ? माओवाद्यांचा पत्रकातून गंभीर आरोप
15
वर्षाच्या अखेरीस आणखी एक महामारी येणार! नॉस्ट्राडेमसचे भाकित काय? जाणून घ्या
16
Video: अंबरनाथच्या उड्डाण पुलावर भीषण अपघात; कारने बाईकस्वार तिघांना उडवले, चौघांचा मृत्यू
17
ऐतिहासिक निर्णय! देशात चार नवे कामगार कायदे तात्काळ लागू; २९ जुने कायदे रद्द, श्रम धोरणाला आधुनिक स्वरूप
18
धक्कादायक! पत्नीने प्रियकरासाठी लग्नाच्या सातव्या दिवशी पतीची हत्या केली
19
उद्धव ठाकरेंचा भाजपाला मोठा धक्का; ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत बडा नेत्याच्या हाती शिवबंधन
20
IND A vs BAN A : 'सुपर ओव्हर'मध्ये भारताचा फ्लॉप शो! एकही चेंडू न खेळता बांगलादेशनं गाठली फायनल
Daily Top 2Weekly Top 5

पुतीन पुन्हा सत्तेत येणार, दीर्घकाळ सत्तेत राहाणारे हे नेते तुम्हाला माहिती आहेत का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2018 16:45 IST

रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन हे रविवारी पुन्हा एकदा अध्यक्षपदाची निवडणूक जिंकण्याची शक्यता आहे. त्यामुळे सुमारे पाव शतक देश चालवण्याची संधी त्यांना मिळणार आहे.

मुंबई- रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन हे रविवारी पुन्हा एकदा अध्यक्षपदाची निवडणूक जिंकण्याची शक्यता आहे. त्यामुळे सुमारे पाव शतक देश चालवण्याची संधी त्यांना मिळणार आहे. पावशतकापेक्षा अधिक काळ सत्तेत राहाणाऱ्या नेत्यांमध्ये ताजिकिस्तानचे अध्यक्ष एमोनॉली राखमोन, कॅमेरुनचे पॉल बिय, इक्वेटोरियल गिनीचे तिओदोरो ओबियांग न्गुएमा यांचा समावेश आहे.सर्वाधीक काळ सत्ता उपभोगणारे नेतेक्युबा- सर्वाधिक काळ राज्यशकट हाकणाऱ्या यादीत क्युबाचे फिडेल कॅस्ट्रो यांचा क्रमांक सर्वात वरती लागतो. त्यांनी ४९ वर्षे सत्ता उपभोगली. २००८ साली त्यांनी सत्ता आपला भाऊ राऊल याच्याकडे सोपवली.तैवान- तैवानचे पहिले अध्यक्ष चँग कै शैक यांनी ४७ वर्षे सत्तेत राहून दुसरा क्रमांक पटकावला आहे. ते चीनचेही राष्ट्राध्यक्ष होते. त्या कालावधीचाही यात समावेश आहे. १९७५ साली त्यांचा मृत्यू झाला.उत्तर कोरिया- उत्तर कोरियाचे संस्थापक राष्ट्राध्यक्ष किम इल सुंग यांनी ४६ वर्षे सत्ता उपभोगली. त्यांचा १९९४ साली मृत्यू झाला. ते आजही कोरियाचे नेते आहेत असे मानले जाते.लिबिया- मुअम्मर गदाफी हे २०११ पर्यंत सलग ४२ वर्षे अध्यक्ष होते. बंडखोरांनी बंड केले नसते तर आणखी काही काळ ते यापदावर राहिले असते.गॅबन- तेलसंपन्न गॅबनचे राष्ट्राध्यक्ष ओमर बोंगो ओडिंबा हे ४१ वर्षे सत्तेत होते. त्यांचा मृत्यू २००९ साली झाला.अल्बानिया- अल्बानियाचे एन्वर होक्सा हे १९८५ साली मृत्यू होईपर्यंत ४० वर्षे सत्तेत होते.झिम्बाम्ब्वे- रॉबर्ट मुगाबे १९८० साली सत्तेत आले ते २०१७ पर्यंत झिम्बाब्वेची सूत्रे सांभाळथ होते. ३७ वर्षांनंतर त्यांना स्तता सोडावी लागली.सध्या दीर्घकाळ सत्तेत असणारे नेते-इक्वोटोरियल गिनी- सध्या सर्वाधीक काळ अध्यक्षपदावर राहिलेले म्हणून तिओदोरो ओबियांग न्गुएमा यांचं नाव घेतलं जातं. ते ३८ वर्षे सत्तेत आहेत. १९७९ साली त्यांनी आपल्या काकांना पदच्युत करुन सत्ता मिळवली.कॅमेरुन- अध्यक्ष- पॉल बिया ३५ वर्षेकाँगो- अध्यक्ष डेनिस सासोऊ ३४ वर्षे (यामध्ये ५ वर्षांचा खंड मोजलेला नाही.)कंबोडिया- पंतप्रधान हुन सेन ३३ वर्षेयुगांडा- अध्यक्ष योवेरी मुसेवेनी- ३२ वर्षेइराण- सर्वोच्च नेते अयातोल्ला खोमेनी २९ वर्षेसुदान- अध्यक्ष ओमर अल बशीर २८ वर्षेकजाखस्तान- अध्यक्ष नुरसुलतान नजरबायेव २८ वर्षेचाड- अध्यक्ष इद्रिस डेबी २७ वर्षेताजिकिस्तान- अध्यक्ष एमोमाली राखमोन २५ वर्षेइरिट्रिया- अध्यक्ष इसायस  अफ्वेर्की २४ वर्षे

टॅग्स :Vladimir Putinव्लादिमीर पुतिनrussiaरशिया