Putin Daughter's Secret Boyfriend: पुतीन यांच्या पोरीचे 'झेलेन्स्की'सोबत अफेअर; एक मुलगीही, खळबळजनक दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2022 10:43 IST2022-05-20T10:38:58+5:302022-05-20T10:43:39+5:30
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या मुलीबाबत धक्कादायक दावा केला जात आहे. पुतीन यांनी आपले खासगी आयुष्य जगापासून लपविलेले आहे.

Putin Daughter's Secret Boyfriend: पुतीन यांच्या पोरीचे 'झेलेन्स्की'सोबत अफेअर; एक मुलगीही, खळबळजनक दावा
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या मुलीबाबत धक्कादायक दावा केला जात आहे. पुतीन यांनी आपले खासगी आयुष्य जगापासून लपविलेले आहे. यामुळे त्यांच्या रहस्यमयी मुली आणि गर्लफ्रेंडबाबत बातम्या येत असतात. युक्रेन युद्धामुळे त्यांच्या खासगी आयुष्यावर जास्तच प्रकाशझोत टाकला जाऊ लागला आहे.
नव्या दाव्यानुसार पुतीन यांची मुलगी कॅटरिना तिखोनोवाचे एक बॅले डान्सरसोबत लफडे आहे. त्याचे नाव इगोर झेलेंस्की असून त्याच्यापासून कॅटरिनाला एक मुलगीदेखील आहे. रशियन मीडिया आऊटलेट आयस्टोरीज आणि जर्मन वृत्तपत्र Der Spiegel ने हा खळबळजनक दावा केला आहे. पुतीन यांची मुलगी कॅटरिनाला एक मुलगी असल्याचे यात म्हटले आहे.
इगोर झेलेंस्की हा जर्मनीच्या म्यूनिच शहरात राहतो. कॅटरिनाने २०१८ -२०१९ मध्ये ५० हून अधिकवेळा म्युनिचचा प्रवास केला आहे. मीडिया रिपोर्टमध्ये काही कागदपत्रांचाही उल्लेख आहे. यामध्ये पुतीन यांच्या मुलीचे रेकॉर्ड आहेत. मॉस्को ते म्युनिचदरम्यान प्रवास केला आहे. यामध्ये दोन वर्षांच्या एका लहान मुलीचा देखील पासपोर्ट आहे. ही मुलगी पुतीन यांची नातही असू शकते. कॅटरिनाने या प्रवासावेळी रशियाच्या राष्ट्राध्यक्षांच्या सुरक्षेसाठी असलेल्या एजन्सीच्या विमानांचा वापर केला आहे.
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्कींसारखेच आडनाव कॅटकरिनाच्या कथित बॉयफ्रेंडचे आहे. द गार्जिअन नुसार इगोरने ४ एप्रिलला खासगी कौटुंबीक कारण देत संचालक पदाचा राजीनामा दिला आहे. या दोघांच्या ठावठिकाण्याबाबत सध्या कोणालाच काही माहिती नाहीय.