शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

मोठी बातमी! पुतीन-जेलेन्स्की समोरासमोर भेटणार, इस्तंबुलमधील चर्चेला यश; रशियाची नरमाईची भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2022 19:02 IST

रशिया आणि युक्रेन यांच्यात मंगळवारी तुर्कीच्या इस्तंबूलमध्ये शांतता चर्चा झाली. सुमारे ३ तास चाललेल्या या बैठकीनंतर रशियाचे मुख्य वार्ताहर मेडिन्स्की यांनी सकारात्मक विधान केलं आहे.

इस्तंबुल-

रशिया आणि युक्रेन यांच्यात मंगळवारी तुर्कीच्या इस्तंबूलमध्ये शांतता चर्चा झाली. सुमारे ३ तास चाललेल्या या बैठकीनंतर रशियाचे मुख्य वार्ताहर मेडिन्स्की यांनी सकारात्मक विधान केलं आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर जेलेन्स्की यांच्यात युद्ध थांबवण्यासाठी बैठक होऊ शकते. याआधी दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांमध्ये याबाबतची चर्चा होणार आहे.

रशियाने कीव्ह आणि चेर्निहाइव्हमधील लष्करी हालचाली कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. कीव्हच्या पत्रकारांनी युक्रेनियन सुरक्षेची हमी देण्यासाठी आंतरराष्ट्रीय कराराची मागणी केली आहे, अशी माहिती व्लादिमीर मेडिन्स्की यांनी दिली. युक्रेनच्या वाटाघाटी करणार्‍या संघाचे सदस्य डेव्हिड अराहमिया यांनी या चर्चेला आपला पहिला विजय म्हटलं आहे. त्यांनी इस्तंबूलमधील चर्चेबाबत माहिती देताना आमचा पहिला विजय म्हणजे रशिया-युक्रेन चर्चा बेलारूसमधून तुर्कस्तानला हलवणं. आम्ही तुर्कीकडे युक्रेनची सुरक्षा हमी म्हणून पाहतो, असं म्हटलं आहे. 

यूके, चीन, अमेरिका, तुर्की, फ्रान्स, कॅनडा, इटली, पोलंड आणि इस्रायल या चर्चेच्या परिणामी युक्रेनसाठी सुरक्षा हमीदार बनू शकतात. ते आंतरराष्ट्रीय करारानुसार काम करतील. जे युक्रेनच्या मागणीनुसार नो फ्लाय झोन तयार करण्यास सक्षम आहेत. पण, सुरक्षा हमीदारांची सध्याची कार्यप्रणाली काही उपयोगी ठरताना दिसत नाही. मारियुपोल आणि खार्किवमध्ये याची प्रचिती आली आहे. 

कीव्ह आणि चेर्निहाइव्ह येथील हल्ले कमी होणारइस्तंबूलमधील चर्चेने काही सकारात्मक आशा निर्माण केल्या आहेत. आता दोन्ही देश युद्ध संपवण्याच्या दिशेने पुढे जाऊ शकतात. रशियाचे उप संरक्षण मंत्री अलेक्झांडर फोमिन यांनी सांगितले की, परस्पर विश्वास वाढवण्यासाठी आणि पुढील चर्चेसाठी परिस्थिती निर्माण करण्यासाठी आम्ही कीव आणि चेर्निहाइव्हच्या दिशेने लष्करी हालचालींमध्ये आमूलाग्र कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.

दुसरीकडे, आज डेन्मार्कच्या संसदेला वोलोदिमीर जेलेन्स्की यांनी संबोधित केलं. मारियोपोलमध्ये रशियाचा हल्ला हा युद्ध गुन्हा आहे. रशियाने मानवतेविरुद्ध गुन्हा केला आहे, असं जेलेन्स्की यांनी म्हटलं. 24 फेब्रुवारीपासून रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू असून आजही रशियाकडून युक्रेनच्या काही भागात हल्ले केले जात आहेत. 

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाwarयुद्धVladimir Putinव्लादिमीर पुतिनrussiaरशिया