अमेरिकेच्या प्रस्तावाला पुतीन यांचा होकार! रशिया-युक्रेन युद्ध थांबवणार, शांतता नांदणार? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2025 22:00 IST2025-03-14T21:59:23+5:302025-03-14T22:00:20+5:30

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्र्म्प आणि रशियाचे अध्यक्ष व्लादीमीर पुतीन यांच्यात सकारात्मक चर्चा झाली असून, अमेरिकेच्या प्रस्तावाला पुतीन यांनी होकार दिला आहे. 

Putin agrees to US proposal! Will Russia-Ukraine war stop, peace prevail? | अमेरिकेच्या प्रस्तावाला पुतीन यांचा होकार! रशिया-युक्रेन युद्ध थांबवणार, शांतता नांदणार? 

अमेरिकेच्या प्रस्तावाला पुतीन यांचा होकार! रशिया-युक्रेन युद्ध थांबवणार, शांतता नांदणार? 

Vladimir Putin Donald Trump:रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध थांबण्यासाठी मागील काही महिन्यांपासून हालचाली सुरू आहेत. युद्ध विराम करण्यासंदर्भात आता पुतीन यांनी सकारात्मक भूमिका मांडली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादीमीर पुतीन यांच्या युद्ध थांबवण्याबद्दल सकारात्मक चर्चा झाली असून, 'हा प्रस्ताव योग्य आहे. आम्ही याचे समर्थन करतो. पण, मुद्दे आहेत ज्यावर आम्हाला चर्चा करणे गरजेचे आहे', असे पुतीन म्हणाले. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

युक्रेन-रशिया युद्ध थांबवण्यासंदर्भात झालेल्या चर्चेवर क्रेमलिनने तडजोडी होऊ शकतात, असे म्हटले आहे. 

डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?

ट्रम्प पुतीन यांना म्हणाले की, "रशियाच्या सैन्याने हजारो युक्रेनच्या जवानांना घेरले आहे आणि ते आता खूप बिकट अवस्थेत आहेत. पुतीन यांना विनंती आहे की, या जवानांना जीवदान द्यावे." अमेरिकेने रशियासमोर ३० दिवस युद्धविराम करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. ज्यावर पुतीन यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. 

व्लादीमीर पुतीन यांची भूमिका काय?

रशियाची राजधानी मॉस्को येथे गुरुवारी पुतीन यांची पत्रकार परिषद झाली. या प्रस्तावाबद्दल पुतीन म्हणाले, "प्रस्ताव चांगला आहे. आम्ही याचे समर्थन करतो. पण, काही मुद्दे आहेत, ज्यावर आम्हाला चर्चा करण्याची गरज आहे."

"या युद्धविरामामुळे शांतता प्रस्थापित झाली पाहिजे आणि या संकटाची मूळ कारणे दूर केली गेली पाहिजेत. आम्हाला आमच्या अमेरिकेच्या सहकाऱ्यांसोबत चर्चा करण्याची गरज आहे. होऊ शकते की, मी डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी चर्चा करेल. ३० दिवसांचा युद्ध विराम युक्रेनसाठी चांगला राहील."

Web Title: Putin agrees to US proposal! Will Russia-Ukraine war stop, peace prevail?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.