पुष्पक एक्स्प्रेसमध्ये आग लागल्याची अफवा पसरल्यानंतर अनेक प्रवासी खाली उतरले होते. त्यावेळी आलेल्या कर्नाटक एक्स्प्रेसची अनेकांना धडक बसली. यात १२ जणांचा मृत्यू झाला. या १२ मृत व्यक्तींपैकी ७ नागरिक नेपाळचे आहेत. नेपाळच्या परराष्ट्र मंत्रालयाने याला दुजोरा दिला असून, मृतांची नावेही सांगितली आहेत.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
नेपाळच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं आहे की, २२ जानेवारी २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजता महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यात एका रेल्वे दुर्घटनेत सात नेपाळी नागरिकांसह १२ लोकांचा मृत्यू झाला. या घटनेबद्दल आम्ही दुःखी आहोत.
पुष्पक एक्स्प्रेस अपघात : मृत्यू झालेले सात नेपाळी नागरिक कोण?
कमला नवीन भंडारी (महिला -वय ४३, रा. कैलाली )
लछीराम पासी (पुरूष - वय ४०, रा. कैलाली)
हिमु नंदराम विश्वकर्मा (वय ११ वर्ष, मंगलसेन अचम)
नंदराम पद्म विश्वकर्मा (पुरूष - वय ४४, मंगलसेन अचम)
मैसरा कामी विश्वकर्मा (महिला - वय ४२, मंगलसेन अचम)
जोकला उर्फ काला कामी (महिला - वय ६०, कमाल बाजार, अछाम)
राधेश्याम राध (पुरुष - वय ३२, डंडुवा बांके)
चार जखमींवर सुरू आहेत उपचार
या घटनेत जखमी झालेल्या ४ पैकी ३ नेपाळी नागरिकांवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर एका गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीवर जळगाव जिल्ह्यातील गोदावरील रुग्णालयात सुरू आहे.
नेपाळ सरकार मयत व्यक्तीचे मृतदेह परत आणण्यासाठी दिल्लीतील नेपाळच्या दूतावास आणि नेपाळमधील भारताच्या दूतावासाच्या संपर्कात आहे. समन्वयाने सुविधा पुरवण्यात येणार आहेत.